धाराशिव / आष्टी – आ. सुरेश धस यांचा खासगी पीए असल्याचा दावा करणारा आशिष विसाळ हा केवळ बनावट पीए नव्हे, तर मोठा खंडणीखोर आणि ब्लॅकमेलर असल्याचे आता उघड झाले आहे. गुरुवारी मराठा कार्यकर्त्यांनी त्याला आष्टीत आमदार सुरेश धस यांच्यासमोर उभे करून, त्याच्या पापांचा पाढा वाचला.
आ. सुरेश धस यांचा दंडुका – ‘यापुढे माझे काम नको!’
या प्रसंगी सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ब्लॅकमेल करण्याच्या विसाळच्या अनेक कहाण्या सांगण्यात आल्या.
- यानंतर आ. सुरेश धस यांनी ‘माझे काही माणसे धाराशिवमध्ये पाठवून चौकशी करतो’ असे आश्वासन दिले.
- तसेच ‘यापुढे माझे कोणतेही काम करायचे नाही’ अशी तंबी देत विसाळचे कनेक्शन संपले असल्याचे जाहीर केले.
पण काही महत्त्वाचे प्रश्न अनुत्तरितच!
या प्रकरणात खूप प्रश्न निर्माण झाले आहेत, ज्यांची उत्तरे देणे गरजेचे आहे.
1️⃣ धाराशिवमध्ये आशिष विसाळ सरकारी अधिकाऱ्यांविरुद्ध अर्ज देत होता का?
- तो स्वतःहून अर्ज करीत होता, की आ. सुरेश धस यांच्या सांगण्यावरून करीत होता?
- त्याने बनावट लेटरपॅड आणि खोटी सही कशाच्या आधारे केली?
2️⃣ स्व. संतोष देशमुख यांच्या कुटुंबासाठी गोळा होणारी मदत कोणाच्या सांगण्यावरून?
- हा पैसा खरोखरच मदतीसाठी गोळा होत होता की, खंडणीसाठी?
- आ. धस यांना या गोष्टीची माहिती होती का?
3️⃣ 18 लाखांची गाडी आणि 2 कोटींची एफडी कोणत्या पैशातून?
- सरकारी अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करून वसूल केलेल्या पैशांतून का?
- कोणत्या प्रकरणांमधून ही कमाई झाली?
4️⃣ जिल्हाधिकारी सचिन ओंबासे यांनी आशिष विसाळच्या अर्जांची दखल का घेतली?
- जावक क्रमांक नसलेल्या अर्जांवर त्यांनी चौकशी समित्या का स्थापन केल्या?
- ते स्वतः चौकशी का करत नव्हते?
5️⃣ “तुमचा हरीकल्याण येळगट्टे करू” धमकीने कोणाचे कल्याण झाले?
- नगरपालिका अधिकाऱ्यांना धमकी देऊन पैसे उकळले का?
- जिल्ह्यात अजून किती जण या ब्लॅकमेलिंगचा बळी ठरले?
अखेर प्रशासन आता जागं होणार का?
विसाळचा प्रकार हा केवळ एकट्याचा कारनामा आहे की, या मागे मोठे जाळे आहे?
➡ या प्रकरणातील अनुत्तरित प्रश्नांची उत्तरे मिळण्याआधीच केस दाबली जाणार का?
➡ विसाळच्या आर्थिक व्यवहारांची, कॉल रेकॉर्डची आणि लेटरपॅड फसवणुकीची चौकशी होणार का?
📢 पुढील अपडेटसाठी वाचत राहा – Dharashiv Live