धाराशिव – धाराशिव तालुक्यातील औसा रोडवर दारफळ पाटीजवळ झालेल्या भीषण अपघातात मोटरसायकलस्वार अनिल बाबासाहेब भांगे (३०, रा. कुरणेनगर) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. याप्रकरणी महेश सुखदेव निंबाळकर (रा. चिखली) यांच्यावर बेंबळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल भांगे हे 4 मे रोजी सायंकाळी 5:30 वाजता मोटरसायकलने धाराशिवहून हबरवलीकडे जात होते. यावेळी निंबाळकर यांनी भरधाव वेगाने आणि निष्काळजीपणे वाहन चालवत भांगे यांच्या मोटरसायकलला जोरदार धडक दिली. या अपघातात भांगे गंभीर जखमी झाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.
मयताच्या पत्नी शामल भांगे यांच्या फिर्यादीवरून निंबाळकर यांच्याविरुद्ध बेंबळी पोलीस ठाण्यात भारतीय दंडविधान संहिता कलम 279, 337, 338, 304(अ) आणि मोटार वाहन कायदा कलम 184 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.