बंजारा समाजाचे थोर संत आणि समाजसुधारक संत सेवालाल महाराज यांच्यावर आधारित गीत ‘Maro Dev Bapu Sevalal’ नुकतेच प्रदर्शित झाले आहे. हे गाणे विशेष चर्चेत आहे कारण महाराष्ट्राच्या ‘मिसेस मुख्यमंत्री’, म्हणजेच अमृता फडणवीस यांनी स्वतःच हे गीत गायले आहे!
गाण्याच्या प्रदर्शनानंतर अवघ्या २४ तासांत तब्बल १ कोटी व्ह्यूज मिळाले आहेत. म्युझिक इंडस्ट्रीत हा मोठा विक्रम मानला जात आहे. गाण्याचे संगीत कामोद सुभाष, तर शब्द नीलेश जलमकर यांनी लिहिले आहेत.
यामधील आणखी एक आकर्षण म्हणजे अमृता फडणवीस यांचा हटके अंदाज! गाण्याच्या व्हिडिओत त्या बंजारा महिलेच्या वेशात झळकल्या आहेत, आणि त्यांच्या दमदार अभिनयाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
मुख्यमंत्र्यांच्या पत्नींचा हा ‘बंजारा’ अंदाज, गाण्याचा तुफान प्रतिसाद आणि व्हायरल ट्रेंड… पाहायला मिळेल का एखादा नवा संगीत प्रवाह? हे पाहणे रंजक ठरेल!