नळदुर्ग-अक्कलकोट रस्त्याच्या दुरुस्तीला ७ फेब्रुवारी रोजी सुरुवात झाली होती. लोकांना वाटलं, आता हा संघर्ष संपला! पण एका दिवसातच दलालांनी पुन्हा हे काम रोखलं!
दलालांचा दहशतवाद – पोलिसांसमोरच शिवीगाळ आणि धमक्या!
काम सुरू होताच काही स्वार्थी दलालांनी रस्ता अडवला, राष्ट्रीय महामार्ग अधिकाऱ्यांना अश्लील भाषेत शिवीगाळ केली – तेही पोलिसांसमोर! लोकांच्या भल्यासाठी काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना शिव्या देणारे हे लोक कोण? आणि सर्वात महत्त्वाचं – पोलिसांनी यांच्यावर गुन्हे दाखल करून तडीपार का केले नाहीत?
“रस्ता आमचा, अडथळे तुमचे – हे खपवून घेणार नाही!”
हा रस्ता भाविक, व्यापारी, विद्यार्थी, पर्यटक आणि शेतकऱ्यांसाठी जीवनवाहिनी आहे. खराब रस्त्यामुळे अपघात वाढत आहेत, लोकांचे जीव जात आहेत, प्रवास कठीण झाला आहे. पण काही दलाल मात्र स्वतःचा फायदा साधण्यासाठी हा विकास अडवत आहेत.
आमदारांना सत्य माहित नाही? की जाणूनबुजून दुर्लक्ष?
तुळजापुर मतदारसंघाचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी प्रेस नोट पाठवून रस्त्याचे काम सुरू झाल्याचे आणि नागरिकांना दिलासा मिळाल्याचे म्हटले आहे.
पण प्रत्यक्षात हे काम लगेचच बंद पडलं – हे आमदारांना माहिती नाही का?
का केवळ प्रेस नोट पाठवून जबाबदारी झटकली जाते?
प्रशासन गप्प का? – लोकांचा सवाल!
जर रस्त्याच्या विकासासाठी विरोध करणाऱ्या गुंडांना वेळीच धडा शिकवला असता, तर आज हा गोंधळ झाला नसता. पण पोलिसांनी या दलालांविरोधात कठोर कारवाई केली का? अजूनही नाही!
“दलालांना तडीपार करा, रस्त्याचं काम सुरू करा!”
👉 राष्ट्रीय महामार्ग अधिकाऱ्यांना शिवीगाळ करणाऱ्या दलालांवर तातडीने गुन्हे दाखल करा!
👉 हे गुंड कोणी पाठीशी घालतेय? लोकांना उत्तर हवं आहे!
👉 आमदारांनी केवळ पत्रकं पाठवू नयेत, जमिनीवर उतरून सत्य पाहावं!
👉 स्वार्थी राजकारण संपवा, जनतेचा रस्ता मोकळा करा!
नळदुर्ग-अक्कलकोट रस्त्याचा हा संघर्ष आता एका वेगळ्याच टप्प्यावर पोहोचला आहे. रस्ता जनतेचा आहे, आणि लोकांनीच आता आवाज उठवायला हवा!