धाराशिव: शहरातील बसस्थानक आणि छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात सार्वजनिक रस्त्यावर वाहने धोकादायकरीत्या उभी केल्याप्रकरणी आनंदनगर पोलिसांनी सहा जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.
याप्रकरणी आरोपी नामे- फारुख हशामोद्दीन शेख (वय 24, मर्दनी कमाण, धाराशिव), संदीप शिवाजी बनसोडे (वय 40, भिमनगर, धाराशिव), योगेश दिलीप वाघ (कापसी सावरगाव, बार्शी, जि. सोलापूर), लक्ष्मण खैरे (वय 29, जुनोनी, धाराशिव), मजहरोद्दीन महेबुब शेख (वय 48, दर्गा रोड, धाराशिव) आणि विशाल बाबुसाहेब पवार (वय 24, जहागिरदारवाडी, धाराशिव) यांच्याविरुद्ध आनंदनगर पोलिस ठाण्यात स्वतंत्र सहा गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 8 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 10.40 ते 12.15 वाजेच्या दरम्यान या आरोपींनी आपापल्या ताब्यातील रिक्षा आणि मोटरसायकली सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस अडथळा निर्माण होईल, अशा प्रकारे उभ्या केल्या होत्या. संबंधित वाहनांमध्ये रिक्षा क्र. एमएच 25 ए.के.1612, रिक्षा क्र. एमएच 25 एन 899, रिक्षा क्र. एमएच 25 ए.के. 1782, मोटरसायकल क्र. एमएच 13 बी.के.1770, रिक्षा क्र. एमएच 25 ए.के. 1328 आणि रिक्षा क्र. एमएच 25 एके 1505 यांचा समावेश आहे.
या प्रकरणी आनंदनगर पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 285 नुसार गुन्हे दाखल केले असून पुढील तपास सुरू आहे.