• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Thursday, July 30, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

राज्यातील ४० तालुक्यात दुष्काळ जाहीर करणार

धाराशिव , लोहारा, वाशी या तालुक्यात दुष्काळ जाहीर ...

admin by admin
November 1, 2023
in महाराष्ट्र
Reading Time: 1 min read
न्या. शिंदे समितीचा पहिला अहवाल स्वीकारला …. कुणबी प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही सुरु
0
SHARES
1.5k
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

मुंबई – राज्यात कमी पावसामुळे काही जिल्ह्यांमध्ये निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता या खरीप हंगामासाठी पहिल्या टप्प्यात ४० तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यास आज राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली. त्यानुसार दुष्काळी परिस्थितीत आवश्यक ती मदत करण्याबाबत तातडीने केंद्राला विनंती करण्यात येणार आहे.

राज्यातील उर्वरित तालुक्यांमधील ज्या मंडळांमध्ये कमी पाऊस झाला आहे त्याबाबतीत आवश्यक ते निकष निश्चित करून तिथे दुष्काळसदृष्य परिस्थिती जाहीर करून या मंडळांकरिता योग्य त्या सवलती देण्यासाठी मदत व पुनर्वसन मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमितीने लवकरात लवकर निर्णय घ्यावा असे निर्देशही यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. त्यानुसार दुसऱ्या टप्प्यात देण्याच्या मदतीबाबत निर्णय घेण्यात येईल.

आज मंत्रिमंडळ बैठकीत मदत व पुनर्वसन विभागाने पीक पाणी परिस्थितीच्या आढाव्यात दुष्काळ जाहीर करण्यासंदर्भातील परिस्थितीची माहिती दिली. यामध्ये दुष्काळ व्यवस्थापन संहिता २०१६ मधल्या तरतुदीनुसार अनिवार्य निर्देशांक आणि प्रभावदर्शक निर्देशांक विचारात घेण्यात आले आहेत.

राज्यात यंदा पावसात एकूण सरासरीच्या १३.४ टक्के घट आली असून रब्बी पेरण्या देखील संथपणे सुरु आहेत. आतापर्यंत १२ टक्के पेरण्या झालेल्या आहेत अशी माहिती यावेळी कृषी विभागाने दिली.

धाराशिव जिल्ह्यात धाराशिव , लोहारा, वाशी या तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे.

नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना दोन हेक्टरऐवजी तीन हेक्टर मर्यादेत मदत

नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषानुसार २ हेक्टर ऐवजी ३ हेक्टर मर्यादेत मदत करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

जून ते ऑक्टोबर 2023 या पावसाळ्यात अतिवृष्टी पुरासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीचे नुकसान झाले. राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषानुसार 2 हेक्टर मर्यादेऐवजी आता 3 हेक्टर मर्यादेत राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या दराने मदत देण्यात येईल.
त्याचप्रमाणे शेत जमिनीच्या नुकसानीसाठी 2 हेक्टर मर्यादेत मिळणारी केवळ अल्पभूधारक शेतकऱ्यांना मिळणारी मदत आता अल्पभूधारक शेतकरी नसलेल्यांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या दराने 2 हेक्टर मर्यादेत मिळेल.

Previous Post

न्या. शिंदे समितीचा पहिला अहवाल स्वीकारला …. कुणबी प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही सुरु

Next Post

राज्य कुस्ती स्पर्धेसाठी आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात – जिल्हाधिकारी

Next Post
राज्य कुस्ती स्पर्धेसाठी आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात – जिल्हाधिकारी

राज्य कुस्ती स्पर्धेसाठी आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात - जिल्हाधिकारी

ताज्या बातम्या

तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

तुळजाभवानी मंदिरात दर्शनादरम्यान महिलेच्या गळ्यातील ६० हजारांचे दागिने लंपास

July 30, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

रामलिंग मंदिर परिसरात भाविकाला लुटले; मोबाईल व रोख रक्कम हिसकावली, चौघांविरुद्ध गुन्हा

July 30, 2026
भ्रष्टाचाराची गळती! ८ कोटींचे तुळजापूर बसस्थानक ठरले ‘पांढरा हत्ती’

भ्रष्टाचाराची गळती! ८ कोटींचे तुळजापूर बसस्थानक ठरले ‘पांढरा हत्ती’

July 30, 2026
भूम नगरपालिकेच्या मुख्याधिकारी शैला डाके यांना नगरसेवकांपासून जीविताला धोका

भूम नगरपालिकेच्या मुख्याधिकारी शैला डाके यांना नगरसेवकांपासून जीविताला धोका

July 30, 2026
धाराशिव भाजप भवनावरून कायदेतज्ज्ञांत रंगला ‘कलगीतुरा’!

धाराशिव भाजप भवनावरून कायदेतज्ज्ञांत रंगला ‘कलगीतुरा’!

July 29, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!