मुरुम : फिर्यादी नामे-बालाजी अंकुश सोमवंशी, वय 44 वर्षे, रा. आष्टाकासार ता. लोहारा ह.मु न्यु बालाजी नगर, मुगळे हॉस्पीटल जवळ उमरगा यांचे घराचे कडी कोंडा अज्ञात व्यक्तीने दि. 01.04.2024 रोजी 12.30 ते 03.30 वा. सु. तोडून आत प्रवेश करुन लाकडी कपाटातील 59 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम 40,000₹असा एकुण 70,700₹ किंमतीचा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे बालाजी सोमवंशी यांनी दि.01.04.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन मुरुम पो. ठाणे येथे 454,380 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
धाराशिव : फिर्यादी नामे-विश्वनाथ नामदेव साबळे, वय 55 वर्षे, रा. सारोळी ता. बार्शी जि. सोलापूर यांची अंदाजे 20,000₹ किंमतीची हिरो कंपनीची स्प्लेंडर क्र एमएच 13 सीजी 2563 ही दि. 28.03.2024 रोजी 12.00 ते 13.00 वा. सु. जिल्हा परिाषद कार्यालय धाराशिव येथुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे विश्वनाथ साबळे यांनी दि.01.04.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पो. ठाणे येथे 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
ढोकी : फिर्यादी नामे-आदित्य विष्णु ढेकणे, वय 23 वर्षे, रा. कौडगाव बावी ता. जि. धाराशिव यांचा अंदाजे 40,000₹ किंमतीचा ॲपल आयफोन 13-128 जीबी स्टारलाईट हा दि.01.04.2024 रोजी 01.00 ते 04.00 वा. सु. सुरज शहाजी कदम यांचे शेतातील कौडगाव ते बावी जाणारे रोडचे बाजूस चालू असलेल्या बांधकामा वरुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे आदित्य ढेकणे यांनी दि.01.04.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन ढोकी पो. ठाणे येथे 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
मारहाण
तुळजापूर :आरोपी नामे-1)रोहण नागराज माने, रा. विवेकानंद नगर, सोलापूर रोड, तुळजापूर जि. धाराशिव व 5 ते 7 मुलांनी दि.30.03.2024 रोजी 08.00 वा. सु. विवेकानंद नगर सोलापूर रोड तुळजापूर येथे फिर्यादी नामे- निखील शिवाजी गरडकर, वय 26 वर्षे, रा. विवेकानंद नगर, सोलापूर रोड तुळजापूर ता. तुळजापूर जि. धाराशिव यांच्या भावाची मुले नामे- अजिंक्यु सुरेश गरडकर,पृथ्वी सुरेश गरडकर यांना नमुद मुलांनी रंगामध्ये ज्वलंनशिल दाह निर्माण करणारा द्रव्य पदार्थ ॲसीड सदृश मिसळून फिर्यादीचे भावाचे दोन्ही मुलांना बाहेर बोलावून घेवून त्यांचे डोक्यावर, चेहऱ्यावर हातावर छातीवर टाकून मुलांचे अंगावरील सर्व त्वचा विद्ररुप करुन गंभीर जखमी केले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे निखील गरडकर यांनी दि.01.04.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो. ठाणे येथे 326(ब) भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.