धाराशिव : मयत नामे-ज्योती सुजितकुमार थोरात, वय 26 वर्षे, रा. हरिदास नगर साळुंखे नगर धाराशिव ता. जि. धाराशिव यांनी दि.01.04.2024 रोजी 08.14 वा. सु. त्यांचे राहात्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. आरोपी नामे- सुजित कुमार शहाजी थोरात, वय 32 वर्षे, रा. हरिदास नगर साळुंखे नगर धाराशिव ता. जि. धाराशिव हे नात्याने मयत ज्योती थोरात यांचे पती असुन यातील नमुद आरोपीने मयत ज्योती थोरात यांना मारहाण करुन शारीरीक व मानसिक त्रास दिल्याने त्यांचे जाचास व त्रासास कंटाळून ज्योती थोरात यांनी आत्महत्या केली आहे. अशा मजकुराच्या मयताचे वडील- काका रामा कांबळे, वय 46 वर्षे, रा. बरमगाव बु. पोस्ट रुईभर, ता.जि. धाराशिव यांनी दि. 01.04.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव शहर पो ठाणे येथे भा.दं.वि. सं. कलम- 498, (अ) 306, 323 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
प्रेमप्रकरणातून आत्महत्या
भूम : मयत नामे-सुरज संजय चव्हाण, वय 21 वर्षे, रा. बह्राणपुर ता. भुम जि. धाराशिव यांनी दि.29.03.2024 रोजी 18.30 वा.सु. ते दि. 01.04.2024 रोजी 10.00 वा. पुर्वी भुम ईरिगेशन ऑफीस येथे गळफास घेवून आत्महत्या केली. आरोपी नामे- रविकांत ऐलगुंडे, रा. पाकनी, ता. उत्तर सोलापूर, 2) अंकीत थोरात, 3) अनिकेत शिंदे, दोघे रा. भुम, 4) ईश्वर तेलंगे रा. हिवरा ता. भुम जि. धाराशिव यांनी संगणमत करुन तु आमृता पोथरे हिच्याशी का बोलतो व तिच्याकडे सारखा का येतो या कारणावरुन मयत सुरज चव्हाण यास मारहाण केल्याने त्यांचे जाचास व त्रासास कंटाळून सुरज चव्हाण यांनी आत्महत्या केली आहे. अशा मजकुराच्या मयताचे वडील- संजय सोगीराज सावंत, वय 47 वर्षे, रा. बह्राणपुर ता. भुम जि. धाराशिव यांनी दि. 01.04.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भुम पो ठाणे येथे भा.दं.वि. सं. कलम- 306, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
मारहाण
तुळजापूर :आरोपी नामे-1)रोहण नागराज माने, रा. विवेकानंद नगर, सोलापूर रोड, तुळजापूर जि. धाराशिव व 5 ते 7 मुलांनी दि.30.03.2024 रोजी 08.00 वा. सु. विवेकानंद नगर सोलापूर रोड तुळजापूर येथे फिर्यादी नामे- निखील शिवाजी गरडकर, वय 26 वर्षे, रा. विवेकानंद नगर, सोलापूर रोड तुळजापूर ता. तुळजापूर जि. धाराशिव यांच्या भावाची मुले नामे- अजिंक्यु सुरेश गरडकर,पृथ्वी सुरेश गरडकर यांना नमुद मुलांनी रंगामध्ये ज्वलंनशिल दाह निर्माण करणारा द्रव्य पदार्थ ॲसीड सदृश मिसळून फिर्यादीचे भावाचे दोन्ही मुलांना बाहेर बोलावून घेवून त्यांचे डोक्यावर, चेहऱ्यावर हातावर छातीवर टाकून मुलांचे अंगावरील सर्व त्वचा विद्ररुप करुन गंभीर जखमी केले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे निखील गरडकर यांनी दि.01.04.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो. ठाणे येथे 326(ब) भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.