मुरुम :आरेापी नामे- 1) याकुब अब्बासअली जेवळे, 2) यासीफ याकुब जेवळे, 3) आरीफ याकुब जेवळे सर्व रा. आलुर ता. उमरगा जि. धाराशिव यांनी दि. 15.10.2023 रोजी 05.30 वा. सु. पाटील हॉस्पीटल आलुर ता. उमरगा येथे फिर्यादी नामे- अल्ताफ अब्बासअली जमादार, वय 46 वर्षे, रा. आलुर ता. उमरगा जि. धाराशिव, हे बालाजी ट्रान्सपोर्ट पुणे येथे वाहन ट्रक घेवून गेलेले पैसे मागण्याचे कारणावरुन नमुद आरोपींनी फिर्यादीस शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, दगडाने मारहाण करुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या अल्ताफ जमादार यांनी दि.15.10.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन मुरुम पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
धाराशिव : आरेापी नामे- 1)बाबा कुरेशी, 2) तोशीब मंजूर शेख, 3) करण भतर नेपते, अनोळखी 4 यांनी दि. 15.10.2023 रोजी 15.45 वा. सु. हॉटेल किनारा साठे चौक येथे फिर्यादी नामे- दादा पंजा पवार, वय 32 वर्षे, रा. पापनाश नगर धाराशिव ता. जि. धाराशिव हे व त्यांचा भाउ हे घरकुल संदर्भात चार्च करत असताना मागील भांडणाचे कारणावरुन नमुद आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवून फिर्यादीस शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, लोखंडी रॉडने, काठीने व लोखंडी सळईने मारहाण करुन जखमी केले. फिर्यादीचा भाउ हा भांडण सोडवण्यास आला असता त्यांनाही नमुद आरोपींनी शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारहाण केली. अशा मजकुराच्या दादा पवार यांनी दि.15.10.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव शहर पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 324, 323, 143, 147, 148, 149, 504, अन्वये गुन्हा नोंदवला आहे.