परंडा – अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या आरोपीस तीन वर्षे सश्रम कारावास व पाच हजार दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. या निकाल अतिरीक्त सत्र न्यायाधिश काळे यांनी दिला आहे.
दि. 12.11.2020 रोजी 00.30 वा. सु. पोलीस ठाणे आंबी हद्दीतील एका गावातील फिर्यादी/ पिडीत ही पाणी आणण्यासाठी जात असताना पिडीत ही अल्पवयीन असुन होलार समाजाची आहे हे माहित असताना देखील आरोपी नामे सागर सुभाष लेकुरवाळे, वय 28 वर्षे, रा. लंगोटवाडी, ता. परंडा यांने फिर्यादीचा विनयभंग करुन फिर्यादीस जिवे मारण्याची धमकी दिली. वगैरे मजकुराचे फिर्यादीवरुन आंबी पोलीस ठाणे येथे गुरनं 108/2020 भा.दं.वि.सं. कलम 354, 506 बाल लैगिंक आपराध कलम 8, 12 व अजाजअप्रका कलम 3(2)(व्हिए), 3(1)(आर)(एस), 3(1)(डब्ल्यु) प्रमाणे दिनांक 13.11.2020 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्याचा तपास तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी, भुम विशाल खांबे यांनी करुन न्यायालयात आरोपीविरुध्द दोषारोपपत्र दाखल केले होते. सदर गुन्ह्यात काळे सो अतिरीक्त सत्र न्यायाधिश, अति. सत्र न्यायालय परंडा यांनी सदर आरोपीस देाषी धरुन 03 वर्षे सश्रम कारावास व 5000/- रुपये दंडाची शिक्षा आज दि. 16.10.2023 रोजी सुनावली आहे. सदर केसमध्ये शासकिय अभियोक्ता म्हणून श्री कोळपे साहेब यांनी कामकाज पाहिले आहे.
अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक, धाराशिव व अपर पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत, धाराशिव यांनी वेळोवेळी केलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी, भुम, गौरीप्रसाद हिरेमठ यांनी व श्री विक्रांत हिंगे, सपोनि आंबी पोस्टे यांनी वेळोवेळी सदर केसचा पाठपुरावा करुन कोर्ट पेरवी अधिकारी ग्रेड पोउपनि/ढगे नेमणूक परंडा पो. स्टे व पोलीस हावलदार/1374 खुणे आंबी पोस्टे यांना सुचना देवून आढावा घेत होते. त्यामुळे सदर आरोपीस न्यायालयाने पुराव्याचे आधारे शिक्षा सुनावली आहे.