• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Monday, September 7, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

मुरूम नगराध्यक्षपद: भाजपमध्येच तिढा!

एकाच पदासाठी तिघांचे अर्ज; मुख्यमंत्री फडणवीस कुणावर विश्वास ठेवणार?

admin by admin
November 14, 2025
in धाराशिव जिल्हा
Reading Time: 1 min read
मुरूम नगराध्यक्षपद: भाजपमध्येच तिढा!
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

मुरूम –  मुरूम नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाची निवडणूक आता अत्यंत रंजक वळणावर येऊन ठेपली आहे. भारतीय जनता पार्टीकडून (भाजप) एकाच पदासाठी तब्बल तीन प्रमुख इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने पक्षात मोठा गोंधळ आणि संभ्रम निर्माण झाला आहे. यामुळे आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमके कुणावर विश्वास टाकतात आणि कुणाला अधिकृत उमेदवारी देतात, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

या प्रकरणाची सुरुवात आज झाली, जेव्हा जिल्हा बँकेचे अध्यक्ष आणि मुरूम कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान अध्यक्ष बापुराव पाटील यांनी मोठ्या शक्तिप्रदर्शनासह आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. “मीच भाजपचा अधिकृत उमेदवार आहे,” हे दाखवून देण्याचा त्यांनी पुरेपूर प्रयत्न केला.

मात्र, त्यांच्या पाठोपाठ काही क्षणातच एक अनपेक्षित घडामोड घडली. पूर्वी काँग्रेसच्या पाठिंब्यावर नगराध्यक्ष राहिलेले धनराज मंगरुळे यांनीही थेट ‘भाजप’ कडूनच नगराध्यक्ष पदासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यामुळे शहरातील राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली.

हा गोंधळ इथेच थांबला नाही. काल गुरुवारीच, भारतीय जनता पार्टीचे एक सक्रिय पदाधिकारी म्हणून ओळखले जाणारे श्रीकांत मिणियार यांनी देखील भाजपचाच उमेदवार म्हणून आपला अर्ज दाखल केला आहे.

एकाच पदासाठी भाजपकडून तीन-तीन मातब्बर उमेदवार रिंगणात उतरल्यामुळे मुरूममधील भाजप कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत आणखीही काहीजण भाजपच्या नावाने अर्ज दाखल करतील, अशी चर्चा सुरू आहे.

आता या तिन्ही उमेदवारांपैकी पक्षाचा अधिकृत ‘एबी फॉर्म’ कुणाला मिळणार, पक्षश्रेष्ठी कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब करणार आणि अखेरीस कोण माघार घेणार, यावरच सर्व राजकीय गणित अवलंबून आहे. या तिघांपैकी मुख्यमंत्री फडणवीस यांचा विश्वास कोण संपादन करतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Previous Post

‘खरेपणा’ आणि राणा पाटलांचा संबंध नाही; बिहारशी तुलना करून जनतेचा अपमान करू नका

Next Post

‘नळाला २४ तास पाणी’… १५ वर्षांनी पुन्हा तेच आश्वासन; धाराशिवकर म्हणतात, ” दादा , हे गाजर किती दिवस?”

Next Post
‘नळाला २४ तास पाणी’… १५ वर्षांनी पुन्हा तेच आश्वासन; धाराशिवकर म्हणतात, ” दादा , हे गाजर किती दिवस?”

'नळाला २४ तास पाणी’... १५ वर्षांनी पुन्हा तेच आश्वासन; धाराशिवकर म्हणतात, " दादा , हे गाजर किती दिवस?"

ताज्या बातम्या

वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

तुळजापूर : मंगरूळ रोडवर नैसर्गिक विधीसाठी थांबलेल्या प्रवाशाला अडवून १० हजारांची रोकड लांबवली

September 6, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

काटगाव : अवैध हातभट्टी दारू अड्ड्यावर कारवाईसाठी गेलेल्या पोलीस पथकावर हल्ला; धक्काबुक्की करत कामात अडथळा

September 6, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

तुळजापूर : खोटे सोन्याचे बिस्कीट देऊन भाविकांची फसवणूक करणारा भामटा बीडमधून जेरबंद

September 6, 2026
अश्विनी पौळ यांच्या तिसऱ्या मुलीचाही मृत्यू; नळदुर्ग किल्ला प्रकरणाने धाराशिव हादरले

अश्विनी पौळ यांच्या तिसऱ्या मुलीचाही मृत्यू; नळदुर्ग किल्ला प्रकरणाने धाराशिव हादरले

September 6, 2026
धाराशिव भाजपमधला ‘पाटील विरुद्ध पाटील’ सामना: पत्रिकेतून साहेबांचा ‘पत्ता कट’ अन् ठाकरेंच्या आमदाराला मानाचे पान!

धाराशिव भाजपमधला ‘पाटील विरुद्ध पाटील’ सामना: पत्रिकेतून साहेबांचा ‘पत्ता कट’ अन् ठाकरेंच्या आमदाराला मानाचे पान!

September 5, 2026

Recent Posts

  • तुळजापूर : मंगरूळ रोडवर नैसर्गिक विधीसाठी थांबलेल्या प्रवाशाला अडवून १० हजारांची रोकड लांबवली
  • काटगाव : अवैध हातभट्टी दारू अड्ड्यावर कारवाईसाठी गेलेल्या पोलीस पथकावर हल्ला; धक्काबुक्की करत कामात अडथळा
  • तुळजापूर : खोटे सोन्याचे बिस्कीट देऊन भाविकांची फसवणूक करणारा भामटा बीडमधून जेरबंद
  • अश्विनी पौळ यांच्या तिसऱ्या मुलीचाही मृत्यू; नळदुर्ग किल्ला प्रकरणाने धाराशिव हादरले
  • धाराशिव भाजपमधला ‘पाटील विरुद्ध पाटील’ सामना: पत्रिकेतून साहेबांचा ‘पत्ता कट’ अन् ठाकरेंच्या आमदाराला मानाचे पान!
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!