मुरुम : फिर्यादी नामे-धोंडीबा हणुमंत राघोजी, वय 61, रा. अचलेर ता. लोहारा जि. धाराशिव यांचे राहात्या घराचे कुलूप अज्ञात व्यक्तींने दि. 27.03.2024 रोजी 00.00 ते दि. 28.03.2024 रोजी 06.00 वा. सु. वा. सु. तोडून आत प्रवेश करुन कपाटातील 26 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चांदीचे दागिने असा एकुण 62,000 ₹ किंमतीचा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे धोंडीबा राघोजी यांनी दि.28.03.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन मुरुम पो. ठाणे येथे 457, 380 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
तामलवाडी : फिर्यादी नामे-शौकत अल्लाउद्दीन बेगडे, वय 49 वर्षे, रा. तामलवाडी ता. तुळजापूर जि. धाराशिव यांचे 6 बोकड 3 शेळ्या अंदाजे 87, 000₹ किंमतीचे दि.26.03.2024 रोजी 21.00 ते दि. 27.03.2024 रोजी 06.00 वा. सु. तामलवाडी येथील प्लॉटवरुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे शौकत बेगडे यांनी दि.28.03.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तामलवाडी पो. ठाणे येथे 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
लोहारा : फिर्यादी नामे-हमीद अमीन खडीवाले, वय 38 वर्षे, रा. मक्तेदार प्लॅटींग लोहारा बु. ता. लोहारा जि. धाराशिव यांची अंदाजे 35,000 ₹ किंमतीची फॅशन प्रो कंपनीची मोटरसायकल क्र एमएच 02 सीएस 5396 ही दि.22.01.2024 रोजी 16.00 ते 17.00 वा. सु. माकणी चौक येथुन अज्ञात आरोपीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे हमीद खडीवाले यांनी दि.28.03.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन लोहारा पो. ठाणे येथे 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
येरमाळा -अनिल हरीभाउ खरतुडे, वय 34 वर्षे, रा. बोडकेवाडी ता. पाटोदा ता. जि. धाराशिव यांची अंदाजे 50,000 ₹ किंमतीची बजाज प्लॅटीना कंपनीची मोटरसायकल क्र एमएच 23 बीजी 5921 ही दि.29.02.2024 रोजी 23.00 वा. सु. वैष्णवी हॉटेल समोर येरमाळा येथुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे अनिल खरतुडे यांनी दि.28.03.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन येरमाळा पो. ठाणे येथे 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
तुळजापूर : फिर्यादी नामे-नवनाथ भागवत येलगुंडे, वय 38 वर्षे, रा. पाणी टाकीसमोर नळदुर्ग रोड तुळजापूर ता. तुळजापूर जि. धाराशिव यांची अंदाजे 28,000 ₹ किंमतीची होंडा शाईन कंपनीची मोटरसायकल क्र एमएच 13 सीई 6583, तसेच अनिल लक्ष्मण कुंभर यांची अंदाजे 18,000 ₹ किंमतीची हिरो स्प्लेंडर प्लस मोटरसायकल क्र एमएच 25 एई 5089 या दोन्ही दि.27.03.2024 रोजी 10.00 ते 19.00 वा. सु. तहसील कार्यालय तुळजापूर येथुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे नवनाथ येलगुंडे यांनी दि.28.03.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो. ठाणे येथे 379 भा.दं.वि.सं.अन्वये गुन्हा नोंदवला आहे.