• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Monday, August 3, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

नळदुर्ग हादरले! घरात घुसून १४ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार; जाब विचारणाऱ्या भावाला रॉडने मारहाण

admin by admin
December 18, 2025
in क्राईम
Reading Time: 1 min read
धाराशिव जिल्ह्यात लैंगिक अत्याचाराच्या तीन घटना उघडकीस; लोहारा, नळदुर्ग, बेंबळी येथे गुन्हे दाखल
0
SHARES
1.5k
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

नळदुर्ग –  नळदुर्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत माणुसकीला काळीमा फासणारी अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. घरात एकटी असलेल्या १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर गावातीलच एका तरुणाने बळजबरीने घरात घुसून लैंगिक अत्याचार केला. इतकेच नव्हे, तर या घटनेचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या पीडितेच्या भावाला आरोपी आणि त्याच्या साथीदारांनी जातीवाचक शिवीगाळ करत लोखंडी रॉड व दगडाने बेदम मारहाण केली. या गंभीर प्रकरणी नळदुर्ग पोलीस ठाण्यात पोक्सो आणि ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नळदुर्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात सोमवार, दि. १५ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी २ ते सायंकाळी ६ च्या दरम्यान ही घटना घडली. पीडित १४ वर्षीय मुलगी घरी एकटी होती. ही संधी साधत गावातील एका तरुणाने तिच्या घरात प्रवेश केला आणि तिच्यावर बळजबरीने लैंगिक अत्याचार केला.

घाबरलेल्या पीडित मुलीने हा प्रकार आपल्या कुटुंबीयांना सांगितला. त्यानंतर पीडित मुलगी आणि तिचे नातेवाईक संबंधित तरुणाला जाब विचारण्यासाठी गेले. त्यावेळी मुख्य आरोपीने त्यांना जातीवाचक शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तसेच, पीडितेच्या भावाला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

यावेळी आरोपीच्या मदतीला आलेले इतर तीन तरुण आणि मुख्य आरोपी यांनी मिळून पीडितेच्या भावावर हल्ला चढवला. त्यांनी लोखंडी रॉड, काठी आणि दगडाने त्याला मारहाण करून जखमी केले आणि जिवे मारण्याची धमकी दिली.

याप्रकरणी पीडित मुलीने बुधवार, दि. १७ डिसेंबर रोजी दिलेल्या फिर्यादीवरून नळदुर्ग पोलीस ठाण्यात मुख्य आरोपीसह चौघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ६४, ६५ (बलात्कार), ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२), ३(५), तसेच बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (POCSO) कलम ४, ६ आणि ॲट्रॉसिटी ॲक्ट (अ.जा.ज.अ.प्र.) च्या विविध कलमान्वये अत्यंत गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.

Previous Post

परंडा हादरले! प्रेमसंबंधाच्या संशयातून तरुणाच्या डोक्याला लावले पिस्तूल; शहरात मारहाणीच्या दोन घटना

Next Post

“मी आमदार राणा पाटलांचा पीए आहे, तुझी नोकरी घालवतो”; तुळजापुरात पोलिसाला धक्काबुक्की आणि दमदाटी

Next Post
“मी आमदार राणा पाटलांचा पीए आहे, तुझी नोकरी घालवतो”; तुळजापुरात पोलिसाला धक्काबुक्की आणि दमदाटी

"मी आमदार राणा पाटलांचा पीए आहे, तुझी नोकरी घालवतो"; तुळजापुरात पोलिसाला धक्काबुक्की आणि दमदाटी

ताज्या बातम्या

धाराशिवचा ‘गेम ऑफ थ्रोन्स’: कमळात फुललाय पाटलांचा ‘वन मॅन शो’ की निष्ठावंतांचा ‘करेक्ट कार्यक्रम’?

धाराशिवचा ‘गेम ऑफ थ्रोन्स’ (पार्ट २): ‘बिनविरोध’च्या नाटकामागील शकुनीमामा आणि देवाभाऊंची ‘तिसरी नजर’!

August 2, 2026
धाराशिवचा ‘गेम ऑफ थ्रोन्स’: कमळात फुललाय पाटलांचा ‘वन मॅन शो’ की निष्ठावंतांचा ‘करेक्ट कार्यक्रम’?

धाराशिवचा ‘गेम ऑफ थ्रोन्स’: कमळात फुललाय पाटलांचा ‘वन मॅन शो’ की निष्ठावंतांचा ‘करेक्ट कार्यक्रम’?

August 2, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

धाराशिव जिल्ह्यात तीन मोटारसायकली चोरीला; तीन पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल

August 2, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

लोहारा तालुक्यातील अचलेर तांड्यावर तुफान राडा! सोलापूरच्या तरुणाला दगड अन् बाभळीच्या काटेरी झुडपाने मारहाण

August 2, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

तुळजापूर तालुक्यातील सिंदगाव येथे जोरदार राडा! तिघांना लाकडाने अन् लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण

August 2, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!