नळदुर्ग : जनावरांची क्रूरपणे वाहतूक केल्याप्रकरणी दोघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना नळदुर्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी नामे-हुसैनी मलाप्पा नंदीवाले (वय 32 वर्षे) आणि तानाजी डिगंबर सोलनकर (वय 25 वर्षे, दोघे रा. बादुला ता. अक्कलकोट जि. सोलापूर) हे दि. 30.01.2025 रोजी सकाळी 10.00 वाजता सु. केशेगाव तांड्याजवळ रोडवर केशेगाव शिवारात टेम्पो क्र एमएच 13 डी.क्यू 7604 मधून तीन खोंड व एक गाय (एकूण 40,000 ₹ किंमतीचे) जनावरांची वाहतूक करत होते.
यावेळी जनावरांना दाटीवाटीने बांधून त्यांच्या चारा पाण्याची कोणतीही व्यवस्था न करता, अत्यंत निर्दयतेने वागणूक देण्यात येत होती. तसेच जनावरांची कत्तल करण्यासाठी त्यांची बेकायदेशीर वाहतूक करत असल्याचे पोलिसांना आढळून आले.
याप्रकरणी नळदुर्ग पोलिसांनी दोघा आरोपींविरुद्ध प्राण्यास क्रूरतेने वागण्यास प्रतिबंध अधिनियम कलम 11(1) (ए),(एफ),(एच),(आय),(के) सह महा. प्राणी संरक्षण अधिनियम कलम 5(अ), 5(क), 9(अ) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास नळदुर्ग पोलीस करत आहेत.