• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Monday, April 13, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

‘पुढे लुटमार चालू आहे, आम्ही पोलीस आहोत’; तोतया पोलिसांकडून प्रवाशाला १ लाख ५८ हजारांचा गंडा

 नळदुर्ग पोलिसांत गुन्हा दाखल

admin by admin
February 20, 2026
in क्राईम
Reading Time: 1 min read
घेतलाय का ‘खाकी’चा इंगा? धाराशिव जिल्ह्यात ‘डुप्लिकेट’ पोलिसांचा सुळसुळाट; एका आठवड्यात तिघांना गंडा!
0
SHARES
700
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

नळदुर्ग : ‘पुढे लुटमार चालू आहे, आम्ही पोलीस आहोत, तुमच्या हातातील सोन्याच्या अंगठ्या काढून खिशात ठेवा’, अशी बतावणी करून तोतया पोलिसांनी एका ५० वर्षीय व्यक्तीची तब्बल १ लाख ५८ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सोन्याच्या अंगठ्या कागदात बांधून देण्याच्या बहाण्याने खोट्या अंगठ्या खिशात ठेवून हा गंडा घालण्यात आला आहे. याप्रकरणी नळदुर्ग पोलीस ठाण्यात दोन अज्ञात भामट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संजय श्रीमंत कोकणे (वय ५० वर्षे, रा. आष्टा कासार, ता. लोहारा, जि. धाराशिव) असे फसवणूक झालेल्या फिर्यादीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १४ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला होता. फिर्यादी संजय कोकणे हे राष्ट्रीय महामार्ग क्र. ६५ (NH 65) वरून नळदुर्ग ते सोलापूर रोडने प्रवास करत होते. इटकळ गावाच्या पुढे असलेल्या ‘महाराष्ट्र रसवंती’जवळ दोन अज्ञात इसमांनी त्यांना अडवले. “आम्ही पोलीस आहोत, पुढे लुटमार चालू आहे, त्यामुळे तुम्ही तुमच्या हातातील सोन्याच्या अंगठ्या काढून सुरक्षित खिशात ठेवा”, अशी थाप मारून त्यांनी कोकणे यांचा विश्वास संपादन केला.

त्यानंतर या भामट्यांनी कोकणे यांच्याजवळील एकूण १ लाख ५८ हजार रुपये किमतीच्या (१० ग्रॅम वजनाच्या) सोन्याच्या अंगठ्या घेतल्या आणि त्या एका कागदात गुंडाळल्याचे नाटक केले. ती कागदाची पुडी त्यांनी कोकणे यांच्या खिशात ठेवली. मात्र, प्रत्यक्षात त्यांनी खऱ्या अंगठ्या हातचलाखीने स्वतःकडे ठेवून खिशात खोट्या अंगठ्या ठेवल्या आणि कोकणे यांची फसवणूक करून तेथून पोबारा केला.

या प्रकरणाबाबत संजय कोकणे यांनी तब्बल सहा दिवसानंतर गुरुवारी, १९ फेब्रुवारी २०२६ रोजी नळदुर्ग पोलीस ठाण्यात प्रथम खबर (FIR) दिली. त्यांच्या तक्रारीवरून नळदुर्ग पोलिसांनी दोन अज्ञात आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३१८(४) आणि ३(५) अन्वये फसवणुकीचा गुन्हा नोंदवला आहे. नळदुर्ग पोलीस या तोतया पोलिसांचा शोध घेत आहेत.


Previous Post

लहान मुलांच्या भांडणातून तरुणावर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला; तुळजापुरात एकाच कुटुंबातील चौघांवर गुन्हा दाखल

Next Post

धाराशिव: भारत फायनान्स कंपनीची पावणेदोन लाखांची फसवणूक; स्वतःच्याच ३ कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल

Next Post
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

धाराशिव: भारत फायनान्स कंपनीची पावणेदोन लाखांची फसवणूक; स्वतःच्याच ३ कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

 चोराखळी : महाकाली कला केंद्रावर तुफान राडा; तलवारी-कोयत्यांचा धाक दाखवून लुटमार आणि तोडफोड

 चोराखळी : महाकाली कला केंद्रावर तुफान राडा; तलवारी-कोयत्यांचा धाक दाखवून लुटमार आणि तोडफोड

April 13, 2026
‘ऑपरेशन टायगर’ करायला गेले, अन् स्वतःच्याच ‘वाघांना’ पिंजऱ्यात कोंडले!

‘ऑपरेशन टायगर’ करायला गेले, अन् स्वतःच्याच ‘वाघांना’ पिंजऱ्यात कोंडले!

April 12, 2026
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

पवनचक्कीवर दरोड्याचा प्रयत्न; सुरक्षारक्षकावर दगडफेक, एकाला शस्त्रांसह पकडले

April 12, 2026
मुरुम येथील खून प्रकरणाचा ४८ तासांत उलगडा; जुन्या वैमनस्यातून कृत्य, एका आरोपीला अटक

चोरीच्या संशयावरून जमावाकडून बेदम मारहाण; एकाचा मृत्यू, निलेगाव येथील १६ जणांवर खुनासह अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

April 12, 2026
धाराशिवमध्ये मोठी फसवणूक: ‘सुखमनी कंपनी’वर कोट्यवधींच्या घोटाळ्याचा आरोप, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

जमीन खरेदीच्या बहाण्याने तब्बल २ कोटी २० लाखांची फसवणूक; येरमाळा पोलिसांत ८ जणांवर गुन्हा दाखल

April 12, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group