• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Wednesday, June 3, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

नळदुर्ग : मैलारपूर येथे श्री खंडोबाची यात्रा १२ ते १४ जानेवारी दरम्यान भरणार

१३ जानेवारी मुख्य आकर्षण, नंदीध्वजांची रोषणाई आणि छबिनाचा जल्लोष

admin by admin
January 8, 2025
in धाराशिव जिल्हा
Reading Time: 1 min read
नळदुर्ग : मैलारपूर येथे श्री खंडोबाची यात्रा १२ ते १४ जानेवारी दरम्यान भरणार
0
SHARES
366
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

मैलारपूर (नळदुर्ग) येथे होणारी श्री खंडोबाची यात्रा १२ ते १४ जानेवारी दरम्यान भरणार आहे. यात्रेचा मुख्य दिवस १३ जानेवारी असून, त्या दिवशी धार्मिक उत्सवाला विशेष महत्त्व असणार आहे. या यात्रेमुळे महाराष्ट्रातील भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे.

१३ जानेवारी रोजी दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. रात्री छबिना निघणार असून, त्यावेळी गावोगावच्या ७०० ते ८०० नंदीध्वज (काठ्या) रोषणाई करून सजवून दाखल होणार आहेत. रात्री १२ वाजताच्या सुमारास अणदूर आणि नळदुर्गच्या मुख्य काठ्यांचे आगमन होईल. यावेळी शोभेचे दारूकाम भाविकांचे आकर्षण ठरणार आहे.

पाच लाखांहून अधिक भाविकांची उपस्थिती अपेक्षित
या यात्रेत तीन दिवसांत सुमारे ५ लाखाहून अधिक भाविक सहभागी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी पोलीस आणि स्थानिक प्रशासनाने कडक नियोजन केले आहे.

शांतता कमिटीची बैठक: अवैध धंद्यांवर आणि अनुचित प्रकारांवर कारवाईची मागणी


मंगळवारी शांतता कमिटीची बैठक झाली. या बैठकीत दोन्ही गावांचे मानकरी, पोलीस अधिकारी आणि पुजारी उपस्थित होते. यात्रेत शांतता राखण्यासाठी विशेष उपाययोजना आखण्यात आल्या.
या बैठकीत पुढील मुद्द्यांवर चर्चा झाली:

1. अवैध धंदे बंद करणे – यात्रेदरम्यान गावठी दारू विक्री होत असल्याची तक्रार होती, त्यामुळे ती तातडीने बंद करण्याची मागणी करण्यात आली.

2. हळदीच्या नावाखाली पिवडी विक्रीवर बंदी – यात्रेत हळदीऐवजी पिवळा रंग विकला जातो. त्यावरही कारवाईची मागणी झाली.

3. अनधिकृत पाळणे बंद करणे – यात्रेत बेकायदेशीर पाळणे उभारून आर्थिक लूट केली जाते. यावर तहसील, पोलीस आणि नगर परिषद यांनी कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.

4. गुंडगिरीला आळा घालण्याचे आदेश – यात्रेत काही लोकांकडून सुरू असलेली गुंडगिरी थांबवून त्यावर कडक कारवाई करावी, अशी विनंती मानकऱ्यांनी केली.

श्री खंडोबा यात्रेत गुंडगिरी करून कुणी पैश्याची मागणी करीत असल्यास पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. 

भाविकांसाठी आवाहन
यात्रा शांततेत पार पडावी, भाविकांनी संयम राखावा आणि नियमांचे पालन करावे, असे आवाहन शांतता कमिटीने केले आहे. श्री खंडोबाच्या कृपाशीर्वादाने यात्रा यशस्वी होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Previous Post

धाराशिव उरुसात अनधिकृत झुले-पाळण्यांची उभारणी, प्रशासनाचे दुर्लक्ष

Next Post

बुलढाणा जिल्ह्यात विचित्र आजाराची साथ

Next Post
बुलढाणा जिल्ह्यात विचित्र आजाराची साथ

बुलढाणा जिल्ह्यात विचित्र आजाराची साथ

ताज्या बातम्या

ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

धाराशिवमध्ये मिरवणुकीत कानठळ्या बसवणाऱ्या ‘डॉल्बी डीजे’वर पोलिसांची कारवाई; सोलापूरच्या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

June 2, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

तुळजापूर बसस्थानकावर पुन्हा धाडसी चोरी! नांदेड बसमध्ये चढताना सोलापूरच्या महिला भाविकाचे ५० हजारांचे मिनीगंठण लंपास

June 2, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

कळंब तालुक्यात दोन ठिकाणी टोळक्यांचा राडा! लग्नाच्या कार्यक्रमात बिअरची बाटली अन् लोखंडी पाईपने मारहाण; १४ जणांवर गुन्हे दाखल

June 2, 2026
धाराशिव जिल्ह्यात लैंगिक अत्याचाराच्या तीन घटना उघडकीस; लोहारा, नळदुर्ग, बेंबळी येथे गुन्हे दाखल

धक्कादायक! धाराशिवमध्ये लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर ७ वर्षे अत्याचार; जातीवाचक शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी

June 2, 2026
उमरगा पोलिसांची धडक कारवाई; नियमभंग करणाऱ्या २६१ वाहनचालकांना सव्वादोन लाखांचा दंड

वाशी तालुक्यात विजोरा शिवारात पोलिसांची मोठी कारवाई; पत्राच्या शेड शेजारील कडब्याखाली लपवलेली तलवार जप्त, एकावर गुन्हा दाखल

June 1, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group