नळदुर्ग : आंब्याच्या रसामध्ये झोपीच्या गोळ्या टाकून कुटुंबाला मारण्याचा कट रचणाऱ्या नंदगावच्या महिलेविरुद्ध नळदुर्ग पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी नामे-भाग्यवती महेशमुमार चिनगुंडे, रा. नंदगाव ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि. 24.05.2024 रोजी 17.00 ते 20.00 वा. सु. नंदगाव येथे फिर्यादी नामे- महेशकुमार जवाहरलाल चिनगुंडे, वय 48 वर्षे, रा. नंदगाव ता. तुळजापूर जि. धाराशिव यांना व त्यांचे घरातील इतर लोकांना अज्ञात कारणासाठी आंब्याच्या रसामध्ये झोपीच्या गुंगीकारक गोळ्या ज्यांचे जानकार वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्याशिवाय अयोग्य मात्रेचे सेवन केल्यास जिवीतास हाणी होवू शकते हे माहित असताना अशा गोळ्या आंब्याच्या रसात टाकल्याने फिर्यादी व त्यांचे घरातील लोकांनी सेवन केल्याने त्यांना गुंगी सेवून झोप लागून जाग आल्यास शारिरीक पिढा झाली आहे. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- महेशकुमार चिनगुंडे यांनी दि.28.05.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 328 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
तरुणाचे अपहरण
“
तुळजापूर : फिर्यादी नामे-श्रीकांत बालाजी कदम, वय 35 वर्षे, रा. वेताळ नगर तुळजापूर ता. तुळजापूर जि. धाराशिव यांचा मुलगा नामे- विजय श्रीकांत कदम, वय 11 वर्षे, रा. वेताळ नगर तुळजापूर ता. तुळजापुर जि. धाराशिव यास दि. 25.05.2024 रोजी 10.00 वा. सु. वेताळ नगर येथुन अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी कोठेतरी घेवून गेले आहे. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- श्रीकांत कदम यांनी दि.28.05.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 363 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
विटाचे पैशाच्या व्यवहारातुन मारहाण
येरमाळा : आरोपी नामे-धनंजय अरुण शिंदे, 2) अरुण पंढरीनाथ शिंदे, 3) शारदारबाई अरुण शिंदे, 4) रजेश त्रंबक शिंदे, 5) ज्ञानेश्वर रमेश शिंदे सर्व रा. कडकनाथवाउी ता. वाशी जि. धाराशिव यांनी दि. 25.05.2024 रोजी 10.45 वा. सु. कडकनाथवाडी विटभट्टी येथे फिर्यादी नामे- रविंद्र केशवराव जगताप, वय 52 वर्षे, रा. कडकनाथवाडी ता. वाशी जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी विटाचे पैशाच्या व्यवहाराच्या कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, विट व काठीने मारहाण करुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- रविंद्र जगताप यांनी दि.28.05.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन येरमाळा पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 324, 323, 504,506, 143, 147, 149 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.