धाराशिव : फिर्यादी नामे-यशपाल विश्वनाथ मुळे, वय 50 वर्षे, रा. वडगाव सि. ता. जि. धाराशिव यांचे शेत गट नं 253 वडगाव सि शिवारातील ओपन पत्रयाचे शेड मधील सहा शेळ्या, एक बकरा, तिन शेळीचे पिल्ले असे एकुण 52,000₹ किंमतीचे हे दि. 27.05.2024 रोजी 03.00 वा. सु. अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले. अशा मजकुराच्या यशपाल मुळे यांनी दि. 29.05.2024 रोजी दिलेल्या प्रथम खाबरेवरुन धाराशिव शहर पो ठाणे येथे भा.द.वि.सं. कलम 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
तामलवाडी : फिर्यादी नामे-रोहीत संतोष तानवडे, वय 25 वर्षे, रा. सावरगाव ता. तुळजापूर जि. धाराशिव यांच्या सावरगाव शिवारातील शेतात पत्रयाचे शेडमध्ये बांधलेल्या दोन जर्सी गाय अंदाजे 60,000₹ किंमतीच्या अज्ञात व्यक्तीने दि. 23.05.2024 रोजी 19.00 ते दि. 24.05.2024 रोजी 06.00 वा. सु. चोरुन नेल्या. अशा मजकुराच्या रोहीत तानवडे यांनी दि. 29.05.2024 रोजी दिलेल्या प्रथम खाबरेवरुन तामलवाडी पो ठाणे येथे भा.द.वि.सं. कलम 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
परंडा : फिर्यादी नामे-सुभाष महादेव शिंदे, वय 54 वर्षे, रा. मंगळवार पेठ परंडा ता. परंडा जि. धाराशिव यांच्या कुर्डूवाउी रोड लगत असलेल्या शेत गट नं 90 मधील अटल सोलार कृषी मोटार पंप 03 एचपी सीरीयल नं 2121987624 अंदाजे 5,000 ₹ किेंमतीचा हा दि.25.05.2024 रोजी 20.30 ते दि. 26.05.2024 रोजी 06.00 वा. सु. अज्ञात व्यक्तीने चोरुन नेला. अशा मजकुराच्या सुभाष शिंदे यांनी दि. 29.05.2024 रोजी दिलेल्या प्रथम खाबरेवरुन परंडा पो ठाणे येथे भा.द.वि.सं. कलम 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
धाराशिव : फिर्यादी नामे-सौरभ दिलीप कदम, वय 27 वर्षे, रा. बालाजी नगर ओमनगर धाराशिव ता. जि. धाराशिव यांचा अंदाजे 7,000₹ किंमतीचा रेडमी वाय 2 कंपनीचा मोबाईल हा सौरभ कदम हे एमएस ई बी ऑफीसच्या समोर धाराशिव येथे बसलेले असताना अज्ञात व्यक्तीने दि. 14.05.2024 रोजी 18.30 वा. सु. सौरभ कदम यांचा मोबाईल फोन चोरुन नेला. अशा मजकुराच्या सौरभ कदम यांनी दि. 29.05.2024 रोजी दिलेल्या प्रथम खाबरेवरुन धाराशिव शहर पो ठाणे येथे भा.द.वि.सं. कलम 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.