येरमाळा : फिर्यादी नामे-वैभव मनोज बारकुल, वय 30 वर्षे, व्यवसाय ट्रक ड्रायव्हर, रा. नरसिंग गल्ली येरमाळा ता. कळंब जि. धाराशिव हे दि. 28.05.2024 रोजी ट्रक क्र एमएच 25 एक्स 9898 सोळा चाकी वाहन ज्यामध्ये सोयाबीन डीओसी माल कळंब येथुन भरुन येरमाळा बार्शी मार्गे दोडबोलापूर कर्नाटक येथे जात होते.
दरम्यान 18.30 वा. सु. येरमाळा घाटात विठाई हॉटेल जवळ आरोपी नामे- 1)कुणाल दत्ता सावंत, रा. कन्हेरवाडी, ता. कळंब, 2)प्रदीप रघुनाथ बेद्रे, रा. येरमाळा, 3) अवधुत गणेश मद्रुपकर रा. बाळे सोलापूर ह.मु. येरमाळा, 4) बालाजी ओव्हाळ, 5) प्रविण शिलवंत, 6) ओम तोरडमल, 7)गोविंद तोरडमल, 8) अर्जुन तोरडमल, 9) चैतन्य तोरडमल, रा. कडकनाथवाडी ता. वाशी, 10) दशरथ उर्फ नाना दगडू शिंदे, रा. येरमाळा, 11) अभिषेक आप्पा सुरवसे, रा. कडकनाथवाडी, ता. वाशी 12) संदीप उर्फ विकी सोमनाथ चव्हाण, रा तेरखेडा ता. वाशी यांनी वैभव बारकुल यांच्या ट्रकला मोटरसायकल लावून आडवून उलट्या कोयत्याने मारहाण करुन सोबत असलेल्या क्लिनरला काठीने मारहाण करुन फिर्यादीच्या पॅन्टच्या खिशातील 79,000₹ काढून घेतले. अशा मजकुराच्या वैभव बारकुल यांनी दि. 29.05.2024 रोजी दिलेल्या प्रथम खाबरेवरुन येरमाळा पो ठाणे येथे भा.द.वि.सं. कलम 395, 341, सह 4, 25 भारतीय हत्यार कायदा अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
विश्वासाने सोपविलेल्या मालाची विक्री करणाऱ्यावर गुन्हा दाखल
नळदुर्ग : फिर्यादी नामे-1)रेवनसिध्दाप्पा कल्याणी होसगाणी, वय 35 वर्षे, रा.केएचडीसी कॉलनी आळंद ता. आळंद जि. गुलबर्गा राज्य कर्नाटक यांनी आरोपी नामे-1)नितीन गंगाराम कांबळे, रा. न्हेनेगाव ता. अक्कलकोट जि. सोलापूर यांना ट्रक क्र एमएच 25 यु 1103 मध्ये हैद्राबाद येथुन 1,000 कट्टे तांदुळ मुंबई येथे घेवून जाण्यासाठी विश्वासाने सोपविले असता नमुद आरोपीने दि.27.05.2024 रोजी 15.00 ते दि. 28.05.2024 रोजी 06.00 वा. सु. रोजी बाभळगाव पेट्रोल पंपा जवळ बाभळगाव शिवार येथे 1,000 कट्टे तांदळा पैकी 400 कट्टे तांदुळ व 335 लिटर डिझेल असा एकुण 3,60,700₹ किमंतीचा माल काढून घेवून गेला आहे. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- रेवनसिध्दाप्पा होसगाणी यांनी दि.29.05.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 407 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.