तुळजापूर : आरोपी नामे-1) निलेश नरेश अमृतराव, 2) सत्यम कोळगे, 3) तेजस कदम,4) प्रमोद गवळी,5) प्रेम पुजारी, 6) अदिनाथ पुजारी, 7) सिध्दराज कामे, सर्व रा. तुळजापूर ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि.26.05.2024 रोजी 18.30 वा. सु. घोगरे कॅन्टींग हाडको मैदान तुळजापूर येथे फिर्यादी नामे- हर्ष बालाजी सोंजी, वय 19 वर्षे, रा. खटकाळ गल्ली तुळजापूर ता. तुळजापूर जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी मागिल भांडणाचे कारणावरुन नमुद आरोपींनी गैर कायद्याची मंडळी जमवून “तु आमच्या पोरा सोबत भांडण करतो का, थांब तुला आता खल्लास करुन टाकतो” असे म्हणून लोखंडी कोयता, तलवार, लाकडी बांबु, लोखंडी रॉडने जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने फिर्यादी व त्याचा मित्र ओम जाधव यास मारहाण करुन गंभीर जखमी केले.शिवीगाळ करुन जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- हर्ष सोंजी यांनी दि.29.05.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 307, 143, 147, 148, 149, भादवि सह कलम 4, 27 भारतीय हत्यार कायदा अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
तुळजापूर : आरोपी नामे-1)हर्ष बालाजी सोंजी, रा. खडकाळ गल्ली तुळजापूर, 2) ओम जाधव रा. तुळजापूर व इतर अनोळखी पाच इसम यांनी दि.26.05.2024 रोजी 19.15 वा. सु. घोगरे कॅन्टीन हाडको तुळजापूर येथे फिर्यादी नामे- अनिकेत नरेश अमृतराव, वय 24 वर्षे, रा. कुंभार गल्ली तुळजापूर ता. तुळजापूर जि. धाराशिव यांना व त्यांचे मित्र यांना नमुद आरोपींनी मागील भाडंणाचे कारणावरुन गैर कायद्याची मंडळी जमवून जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, तलवार,काठीने मारहाण करुन गंभीर जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- अनिकेत अमृतराव यांनी दि.29.05.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 307, 143, 147, 148, 149, 504, 506भादवि सह कलम 4, 27 भारतीय हत्यार कायदा अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
वाशी : आरोपी नामे-1) विकास बारकुल, 2) नटराज बारकुल, 3) संजय बाबा बारकुल, 4) मनोज बारकुल, 5) शरद बारकुल, 6) सुहार बारकुल, 7) रितेश बारकुल, 8) गणेश पवार, सर्व रा. येरमाळा ता. कळंब जि. धाराशिव यांनी दि.25.05.2024 रोजी 19.15 वा. सु. वाशी फाटा येथे फिर्यादी नामे- कैलास विनायक गायकवाड, वय 38 वर्षे, रा. सरमकुंडी ता. वाशी जि. धाराशिव हे मोटरसायकलवरुन वाशी येथे जात होते. दरम्यान वाशी फाटा येथे गाडीने कट मारल्याचे कारणावरुन नमुद आरोपींनी जातीवाचक शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी,तलवारीचे मुठीने पोटात ठोसा मारुन जखमी केले. तसेच फिर्यादीचे खिशातील रोख रक्कम 20,000₹ काढून घेवून जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- कैलास गायकवाड यांनी दि.29.05.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन वाशी पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 327, 324, 323, 504, 506, 143, 147, 148, 149, भादवि सह कलम 4/25 भारतीय हत्यार कायदा, सह अ.जा.ज.अ.प्र कायदा कलम 3(1)(आर)(एस), 3(2) (व्ही.ए) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
येरमाळा : आरोपी नामे-1)संजय बाबा बारकुल, 2) शरद बारकुल, 3) मनोज बारकुल, 4) विकास बारकुल, 5) नटराज बारकुल, 6) प्रितेश बारकुल, 7) गणेश पवार सर्व रा. येरमाळा ता. कळंब जि. धाराशिव यांनी दि. 28.05.2024 रोजी 22.30 ते 23.00 वा. सु. येरमाळा बसस्थानक जवळ फिर्यादी नामे- वैशाली सुनिल शिलवंत, वय 38 वर्षे, रा. कडकनाथवाडी ता. वाशी जि. धाराशिव यांना व यांच्या सोबतच्या महिला यांना नमुद आरोपींनी पोलीसा ठाणे येरमाळा येथे का गेलात असा जाब विचारले असता फिर्यादीने आमचे मुलावर खोटी केस का करता असे विचारण्याचे कारणावरून नमुद आरोपींनी जातीवाचक शिवीगाळ करुन तुमच्या मुलावर मोठी कलमे लावतो अशी धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- वैशाली शिलवंत यांनी दि.29.05.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन येरमाळा पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 143, 147, 504, 506 सह अ.जा.ज.अ.प्र कायदा कलम 3(1)(आर) 3(1) (एस), 3(2) (व्ही.ए) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.