नळदुर्ग : मयत नामे- जिवक चुडांमनी सुरवसे, वय 40 वर्षे, रा.मुरुम ता. उमरगा जि. धाराशिव ह.मु. भिमनगर नळदुर्ग ता. तुळजापूर जि. धाराशिव हे दि.10.04.2024 रोजी 17.00 वा. सु. मोटरसायकल कार क्र एमएच 25 एवाय 5330 वर बसुन अक्कलकोट ते नळदुर्ग रोडवरुन जात होते. दरम्यान गणेश खिळा मंदीरा जवळ नळदुर्ग शिवारात अज्ञात वाहन चालकाने त्याचे ताब्यातील वाहन हे हायगई व निष्काळजीपणे चालवून जिवक सुरवसे यांचे मोटरसायकलला धडक दिली. या अपघातात जिवक सुरवसे हे गंभीर जखमी होवून मयत झाले.अशा मजकुराच्या मयताची पत्नी फिर्यादी नामे सुषमा जिवक सुरवसे, वय 37 वर्षे, रा. मुरुम ता. उमरगा जि. धाराशिव ह.मु. भिमनगर नळदुर्ग ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि.11.04.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम- 279, 304(अ) सह कलम 134 (अ) (ब), 184 मोवाका अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
वाशी : दि. 29.03.2024 रोजी 01.00 वा. सु. पार्डी शिवारात पार्डी फाटा ते भुम जाणारे रोडवर अज्ञात वाहन चालकाने त्याचे ताब्यातील वाहन हे हायगई व निष्काळजीपणे चालवून वेडसर महिलेला धडक देवून तिला गंभीर जखमी करुन तिचे मरणास कारणीभुत झाला आहे. अपघात करुन त्या ठिकाणी न थांबता वाहनासह पसार झाला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे बाळासाहेब दत्तात्रय औताडे, पोना/1598, वय 36 वर्षे, नेमणुक पोलीस ठाणे वाशी यांनी दि.11.04.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम- 279, 304(अ) सह कलम 134 (अ) (ब), 184 मोवाका अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
शोभेची दारु उडवून हयगयीचे कृत्य करणाऱ्यावर गुन्हा दाखल
लोहारा : आरोपी नामे-परमेश्वर मेसा प्रताप, वय 47 वर्षे, रा. हिप्परगा रवा, ता. लोहारा जि. धाराशिव यांनी दि. 11.04.2024 रोजी 01.30 वा. सु. हिप्परगा रवा येथील नरसिंह महाराज मंदीराचे समोर मोकळा जागेत चौथऱ्यावर ठेवलेल्या शोभेच्या दारुची काळजी न घेता त्याचे जवळील शोभेची दारु उडवून हयगयीचे कृत्य करुन कार्यक्रम पाहण्यास आलेले लोक जखमी होणेस कारणीभुत झाला. अशा मुजकुराच्या फिर्यादी नामे- विजयकुमार बाबासाहेब कोळी, पोना/1339 नेमणुक पोलीस ठाणे लोहारा यांनी दि. 11.04.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन लोहारा पो. ठाणे येथे 285, 286, 337 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.