• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Sunday, October 18, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा भररस्त्यात निर्घृण खून; नळदुर्ग येथील घटनेत पतीला जन्मठेप

admin by admin
March 27, 2026
in क्राईम
Reading Time: 1 min read
धाराशिव तालुक्यातील लाचखोर तलाठ्यास पाच वर्षांचा कारावास
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव: पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा चाकू आणि कात्रीने भोसकून खून करणाऱ्या पतीला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेप आणि ३० हजार रुपये द्रव्य दंडाची शिक्षा सुनावली आहे. वाहीद बिलाल कुरेशी (वय ३८) असे जन्मठेपेची शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. नळदुर्ग येथे ५ नोव्हेंबर २०२४ रोजी ही धक्कादायक घटना घडली होती.

या प्रकरणी मयत सुलताना हिचा भाऊ खलील हुसेन शेख (वय ३२, रा. अबदूर, ता. तुळजापूर) याने नळदुर्ग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. फिर्यादीची बहीण सुलताना ही नळदुर्ग येथील सरकारी दवाखान्यासमोर चहाची टपरी चालवून आपला व्यवसाय करत होती. तिचा पती, आरोपी वाहीद कुरेशी हा तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन सतत भांडण व मारहाण करत असे. या जाचाला कंटाळून सुलताना काही दिवस तिच्या मोठ्या बहिणीकडे हैदराबाद येथे गेली होती. मात्र, नातेवाईकांनी समजूत काढल्यानंतर वाहीद तिला पुन्हा घेऊन आला होता.

दिनांक ५ नोव्हेंबर २०२४ रोजी चहाच्या टपरीवर वाहीद आणि सुलताना यांच्यामध्ये पुन्हा भांडण सुरू झाले. यावेळी वाहीदने एका हातात चाकू आणि दुसऱ्या हातात कात्री घेऊन सुलतानावर सपासप वार करण्यास सुरुवात केली. या प्राणघातक हल्ल्यात पोटात, पाठीवर आणि बरगडीवर वार झाल्याने रक्तबंबाळ झालेली सुलताना जागीच मरण पावली. सुलतानाचा भाऊ तिला वाचवण्यासाठी मध्ये गेला असता, आरोपीने त्यालाही जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर आरोपी वाहीद याने स्वतःच्या पोटावर व गळ्यावर चाकूने वार करून घेतले.

गंभीर जखमी झालेल्या आरोपी वाहीदवर सोलापूर येथील श्री. छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार करण्यात आले. या प्रकरणी नळदुर्ग पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १०३ (१), ३५१ (२), (३) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक आय. आर. नांगरे यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून हत्यारे जप्त केली, तर तपासी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक एन. पी. सोळुंके यांनी तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

या खटल्याची सुनावणी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती अभिश्री देव यांच्यासमोर झाली. सरकार पक्षाच्या वतीने जिल्हा शासकीय अभियोक्ता महेंद्र बी. देशमुख यांनी एकूण १२ साक्षीदार तपासले. या खटल्यात एका बाल साक्षीदाराची साक्ष अत्यंत महत्त्वाची ठरली. ॲड. महेंद्र देशमुख यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने २५ मार्च २०२६ रोजी आरोपी वाहीद कुरेशी याला दोषी ठरवत जन्मठेप व ३० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. या प्रकरणात कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून पोलीस अंमलदार संजय जटे यांनी काम पाहिले.

Previous Post

पवनराजे निंबाळकर हत्याकांड: सर्व आरोपींना २० एप्रिलला कोर्टात हजर राहण्याचे ‘फायनल’ आदेश; निकालाची प्रतीक्षा लांबणीवर

Next Post

परंडा पोलीस ठाण्यातच पोलिसांवर हल्ला; ‘वर्दी घालवण्याची’ धमकी देत पोलिसाच्या बोटाचा घेतला चावा

Next Post
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

परंडा पोलीस ठाण्यातच पोलिसांवर हल्ला; 'वर्दी घालवण्याची' धमकी देत पोलिसाच्या बोटाचा घेतला चावा

ताज्या बातम्या

वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

धाराशिव जिल्ह्यात अपहरणाच्या दोन घटना; ढोकीत ५२ वर्षीय व्यक्ती तर आनंदनगरमध्ये १६ वर्षीय मुलगा बेपत्ता

October 17, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

उमरगा : ‘आमच्याकडे रागाने का बघतोस?’ म्हणून २४ वर्षीय तरुणावर कोयता, काठी अन् बेल्टने हल्ला

October 17, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

खामसवाडी : प्रेमविवाह केल्याचा राग मनात धरून कॉम्प्युटर सेंटरचालकावर चाकू अन् लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला

October 17, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

जळकोट शिवार : शेतीच्या वादातून रक्तरंजित थरार; चाकू व दगडाने प्राणघातक हल्ला करून तरुणाला केले गंभीर जखमी

October 17, 2026
मुरुम येथील खून प्रकरणाचा ४८ तासांत उलगडा; जुन्या वैमनस्यातून कृत्य, एका आरोपीला अटक

भंडारी शिवार : हॉटेलमध्ये नेहमी रागावल्याचा मनात धरला राग; ओडिशातून आलेल्या वेटरने डोक्यात वार करून मालकाचाच केला निर्घृण खून

October 17, 2026

Recent Posts

  • धाराशिव जिल्ह्यात अपहरणाच्या दोन घटना; ढोकीत ५२ वर्षीय व्यक्ती तर आनंदनगरमध्ये १६ वर्षीय मुलगा बेपत्ता
  • उमरगा : ‘आमच्याकडे रागाने का बघतोस?’ म्हणून २४ वर्षीय तरुणावर कोयता, काठी अन् बेल्टने हल्ला
  • खामसवाडी : प्रेमविवाह केल्याचा राग मनात धरून कॉम्प्युटर सेंटरचालकावर चाकू अन् लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला
  • जळकोट शिवार : शेतीच्या वादातून रक्तरंजित थरार; चाकू व दगडाने प्राणघातक हल्ला करून तरुणाला केले गंभीर जखमी
  • भंडारी शिवार : हॉटेलमध्ये नेहमी रागावल्याचा मनात धरला राग; ओडिशातून आलेल्या वेटरने डोक्यात वार करून मालकाचाच केला निर्घृण खून
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!