• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Tuesday, September 15, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिवच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील लाचखोर वैद्यकीय पती – पत्नी चतुर्भुज

रक्तपेढी तपासणीत त्रुटी न काढण्यासाठी मागितली एक लाख लाच

admin by admin
March 9, 2024
in मराठवाड़ा
Reading Time: 1 min read
दोन हजराची लाच घेताना भूम वन परीक्षेत्र कार्यालयातील कर्मचारी चतुर्भुज
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

नांदेड – रक्त केंद्राच्या (रक्तपेढी) तपासणीत त्रुटी न काढण्यासाठी एक लाख १० हजार रुपये लाचेची मागणी करून, तडजोडीअंती ५० हजार लाच घेतत्याप्रकरणी धाराशिवच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्विनी किशनराव गोरे, आणि त्यांचे पती डॉ. प्रितम तुकाराम राऊत यांच्याविरुद्ध नांदेडच्या वजीराबाद पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नांदेडच्या अँटी करप्शन ब्युरो पथकाने ही कारवाई केली आहे.

डॉ. अश्विनी किशनराव गोरे, वय 42 वर्षे, पद – वैदयकीय अधिकारी, उपजिल्हा रूग्णालय उदगीर, जि. लातुर अतिरिक्त कार्यभार प्रादेशिक रक्त संक्रमण अधिकारी, (वर्ग -1), प्रादेशिक रक्त संक्रमण कार्यालय,धाराशिव, जि. धाराशिव, 2) डॉ. प्रितम तुकाराम राऊत, वय 48 वर्षे, (आलोसे क्र. 1 यांचे पती) पद – वैदयकीय अधिकारी, अस्थीरोग तज्ञ, (वर्ग -1), शासकीय वैदयकीय महाविद्यालय व रूग्णालय, धाराशिव, जि. धाराशिव. दोघे रा. क्वॉटर्स क्र.3, क्लास 1 क्वॉटर्स, सिव्हील हॉस्पिटल कॅम्पस, मारवाडी गल्ली, धाराशिव, जि. धाराशिव असे दोन लाचखोर पती -पत्नी आहेत. कामापेक्षा लाच कुठे आणि कशी मिळेल, याकडे यांचे लक्ष होते.

घडले असे की , यातील तक्रारदार ( पुरुष, वय 42 वर्षे ) यांचे डॉक्टर लेन, नांदेड येथे अर्पण रक्तकेंद्र (रक्तपेढी) आहे. दि. 07/03/2024 रोजी यातील आलोसे डॉ. अश्विनी गोरे यांनी दुपारी एक वाजण्याचे सुमारास त्यांचे रक्त केंद्राला (रक्तपेढी) भेट देवून तपासणी केली. रक्त केंद्राची (रक्तपेढी) तपासणी झाल्यानंतर जातेवेळी दुपारी साडे चार वाजण्याचे सुमारास त्या तक्रारदार यांना म्हणाल्या की, रक्त केंद्राच्या (रक्तपेढी) तपासणीत त्रुटी न काढण्यासाठी रू. 1,10,000/- द्यावे लागतील, नाही तर तुमचे रक्तकेंद्र (रक्तपेढी) कायमचे बंद करण्याची कारवाई केली जाईल. त्यावेळी तक्रारदार यांनी त्यांना आता सध्या पैसे नाहीत असे म्हणाले असता, आलोसे क्र. 1 यांनी आता जेवढे आहेत तेवढे द्या असे सांगितले. आलोसे डॉ. अश्विनी गोरे यांना मागितलेली रक्कम नाही दिली तर ते तक्रारदार यांचे रक्तकेंद्र (रक्तपेढी) बंद करण्याची कारवाई करतील या भितीने तक्रारदार यांनी त्यांना रू. 10,000/- दिले. त्यानंतर आलोसे क्र. 1 यांनी उर्वरित रू. 1,00,000/- दि. 08/03/2024 रोजी दया, ते पैसे घेण्यासाठी मी माणूस पाठविते असे त्यांनी तक्रारदार यांना सांगितले. सदरची रक्कम रु.1,00,000/- ही लाच असल्याचे तक्रारदार यांना खात्री झाल्याने, त्यांना ती देण्याची इच्छा नसल्याने, त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नांदेड येथे तक्रार दिली.

आज दि. 08/03/2024 रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पथकाने तक्रारदार यांना लाच मागणी पडताळणीसाठी आरोपी लोकसेविका डॉ. अश्विनी गोरे यांचे मोबाईलवर पंचासमक्ष कॉल लावला असता, आलोसे डॉ. अश्विनी गोरे यांनी कॉल उचलला नाही. लगेच तक्रारदार यांना एक कॉल आला व त्याने सांगितले की, मला डॉ. अश्विनी गोरे मॅडम यांनी तुम्हाला भेटण्यास सांगितले आहे, तुम्ही पोलीस अधीक्षक कार्यालय, नांदेड समोर या असे सांगितले. त्याप्रमाणे तक्रारदार यांना पंचासह पोलीस अधीक्षक कार्यालय, नांदेड समोर पडताळणीसाठी पाठविले असता, त्याठिकाणी एक इसम आला व त्याने मला डॉ. अश्विनी गोरे मॅडम यांनी पाठविले आहे असे सांगितले. तेव्हा तक्रारदार यांनी डॉ. अश्विनी गोरे यांना खात्री करण्यासाठी पंचासमक्ष मोबाईलवर कॉल केला असता, त्यांनी तक्रारदार यांना डॉ. अश्विनी गोरे यांनी तेथे माळी आलेले आहेत. आणले का, किती आणले, त्यांना द्या, असे म्हणाल्या. तेव्हा तक्रारदार यांनी रू. 50,000/- आणलेले आहेत असे सांगितले असता, आलोसे डॉ. अश्विनी गोरे यांनी तुम्ही दिलेला शब्द पाळा, ठरल्याप्रमाणे दया असे म्हणाल्या. तेव्हा तक्रारदार यांनी आज सुट्टीचा दिवस आहे. पैसे जमवाजमव करायला वेळ लागेल असे सांगितले. तेव्हा आलोसे डॉ. अश्विनी गोरे यांनी ठिक आहे, माझे माणसाकडे दया असे म्हणून फोन कट केला.
तक्रारदार यांनी आलोसे क्र. 2 डॉ. प्रितम राऊत यांना पैसे घेवून येतो असे म्हणून परत आले. त्यानंतर तक्रारदार यांनी आलोसे क्र. 2 यांची पोलीस अधीक्षक कार्यालय, नांदेड समोर पंचासमक्ष भेट घेतली असता. आलोसे क्र. 2 डॉ. प्रितम तुकाराम राऊत यांनी तक्रारदार यांच्याकडून पंचासमक्ष सदरची लाच रक्कम रू. 50,000/- स्विकारली. तक्रारदार यांनी तात्काळ इशारा दिल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नांदेड च्या पथकाने आलोसे क्र. 2 यास रंगेहाथ पकडले.आरोपी लोकसेवक डॉ. प्रितम तुकाराम राऊत यांना ताब्यात घेण्यात आले असुन पो.स्टे. वजीराबाद, जि. नांदेड येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असुन पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नांदेड हे करीत आहेत.

हा सापळा गजानन बोडके, पोलीस निरीक्षक, पोना/राजेश राठोड, पोकॉ/स.खदीर, पोकॉ/बालाजी मेकाले,पोकॉ/अरशद खान, चापोना/प्रकाश मामुलवार, अँटी करप्शन ब्युरो,नांदेड यांनी रचला होता.

Previous Post

धाराशिव जिल्ह्यात हाणामारीचे चार गुन्हे दाखल

Next Post

जेवळीत तू फोन का कट केला म्हणत डॉक्टरला मारहाण

Next Post
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी

जेवळीत तू फोन का कट केला म्हणत डॉक्टरला मारहाण

ताज्या बातम्या

धाराशिव जिल्ह्यात लैंगिक अत्याचाराच्या तीन घटना उघडकीस; लोहारा, नळदुर्ग, बेंबळी येथे गुन्हे दाखल

तामलवाडी : १४ वर्षीय अल्पवयीन मुलाचे हातपाय बांधून शेतात लैंगिक अत्याचार

September 14, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

शिंगोली : “शाळेत शिवीगाळ का केली?” विचारल्यावरून तरुणाला रस्त्यावर आपटून बेदम मारहाण; आनंदनगर पोलिसांत गुन्हा दाखल

September 14, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

माणकेश्वर : बेकायदेशीर बैलगाडा शर्यतीवरून दोन गटांत तुंबळ हाणामारी; दगड-काठ्यांच्या हल्ल्यात ४ जण जखमी

September 14, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

आळणी येथे दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयता, कत्ती व पिस्तुलाचा वापर, तीन वेगवेगळ्या गुन्ह्यांची नोंद

September 13, 2026
मुरुम येथील खून प्रकरणाचा ४८ तासांत उलगडा; जुन्या वैमनस्यातून कृत्य, एका आरोपीला अटक

बुकनवाडीत थरार : चौकातून दुचाकी नेण्याच्या वादातून २४ वर्षीय तरुणाचा पोटात धारदार शस्त्र खुपसून खून; ५ जण गंभीर

September 13, 2026

Recent Posts

  • तामलवाडी : १४ वर्षीय अल्पवयीन मुलाचे हातपाय बांधून शेतात लैंगिक अत्याचार
  • शिंगोली : “शाळेत शिवीगाळ का केली?” विचारल्यावरून तरुणाला रस्त्यावर आपटून बेदम मारहाण; आनंदनगर पोलिसांत गुन्हा दाखल
  • माणकेश्वर : बेकायदेशीर बैलगाडा शर्यतीवरून दोन गटांत तुंबळ हाणामारी; दगड-काठ्यांच्या हल्ल्यात ४ जण जखमी
  • आळणी येथे दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयता, कत्ती व पिस्तुलाचा वापर, तीन वेगवेगळ्या गुन्ह्यांची नोंद
  • बुकनवाडीत थरार : चौकातून दुचाकी नेण्याच्या वादातून २४ वर्षीय तरुणाचा पोटात धारदार शस्त्र खुपसून खून; ५ जण गंभीर
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!