लोहारा : फोन केला असता फोन कट का केला या कारणावरुन जेवळी प्राथमिक आरोग्य केंद्रातिला वैदयकीय अधिकारी गणेश अशोक मुंडे यांना शिवीगाळ करुन काठीने मारहाण केल्याप्रकरणी आरोपी नामे-अक्षय गोपाळ दंडगुले याच्याविरुद्ध लोहारा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी नामे- गणेश अशोक मुंडे, वय 30 वर्षे, व्यवसाय वैदयकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र जेवळी रा. माउली नगर परळी ता. परळी जि. बीड हे दि. 07.03.2024 रोजी 16.30 वा. सु. सरकारी अरोग्य केंद्र जेवळी येथे शासकीय कामकाज करत असताना आरोपी नामे-अक्षय गोपाळ दंडगुले, रा. जेवळी ता. लोहारा जि. धाराशिव याने फोन केला असता फोन कट का केला या कारणावरुन नमुद आरोपीने फिर्यादी व त्यांचे सहकारी निलप्पा बसवंत बिराजदार यांच्याशी हुज्जत घालून, अरेरावीची, असभ्य भाषा करुन वाद घालून शिवीगाळ करुन काठीने मारुन जखमी केले. व जिवे ठार मरण्याची धमकी दिली. तसेच शासकीय कामात अडथळा निर्माण केला. यावरुन गणेश मुंडे यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि. सं. कलम- 353, 332, 324, 323, 504, 506 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
मागील भांडणाचे कारणावरुन मारहाण
उमरगा :आरोपी नामे-1)मुन्नाबाई व्यंकट कांबळे, 2) व्यंकट पांडुरंग कांबळे, 3) सोन्या व्यंकट कांबळे, 4) समर्थ व्यंकट कांबळे सर्व रा. येळी ता. उमरगा जि. धाराशिव यांनी दि. 05.03.2024 रोजी 21.00 वा. सु. येळी येथे फिर्यादी नामे- मारुती अशोक सजगुरे, वय 38 वर्षे, रा. येळी ता. उमरगा जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी मागील भांडणाचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, दगड व काठीने मारहाण करुन जखमी केले. तसेच फिर्याची पत्नी अंजली सजगुरे ही भांडण सोडवण्यास आली असता नमुद आरोपींनी त्यांनाही शिवीगाळ करुन काठीने गुडघ्यावर मारुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी मारुती सजगुरे यांनी दि.08.03.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उमरगा पो. ठाणे येथे 324, 323, 504, 506, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
तु माझ्या कडे काय बघतोस म्हणून मारहाण
धाराशिव :आरोपी नामे-1) राहुल वाघमारे उर्फ डॉनर रा. भिमनगर धाराशिव ता. जि. धाराशिव यांनी दि.07.03.2024 रोजी 21.30 वा. सु. हनुमान चौकातील हॉटेल जय भवानी धाराशिव येथे फिर्यादी नमे- मनोज शाहुराज वाघमारे, वय 23 वर्षे, र. भिमनगर धराशिव ता. जि. धारशिव यांना नमुद आरोपीने तु माझ्या कडे काय बघतोस असे म्हाणून शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, बिअरची बाटली व काठीने मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- मनोज वाघमारे यांनी दि.08.03.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धराशिव शहर पो. ठाणे येथे 324, 323, 504, भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.