• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Wednesday, March 18, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

शासकीय कामात अडथळा; पवनचक्कीच्या कामगारांना मारहाण, तिघांवर गुन्हा दाखल

नळदुर्ग पोलिसांची कारवाई; गंधोरा शिवारातील घटना

admin by admin
March 18, 2026
in क्राईम
Reading Time: 1 min read
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार
0
SHARES
98
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

नळदुर्ग :  तुळजापूर तालुक्यातील गंधोरा शिवारात पवनचक्कीच्या तारा ओढण्याचे काम सुरु असताना शासकीय कामात अडथळा निर्माण करत पोलिसांसह कामगारांना शिवीगाळ व दगडफेक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कामगारांना तारेने मारहाण करून जखमी केल्याप्रकरणी नळदुर्ग पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध मंगळवारी (ता. १७) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी नळदुर्ग पोलिस ठाण्याचे अंमलदार शंकर पुंडलिक कांबळे (वय ३७) यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली आहे. त्यानुसार रुक्मिणी कल्लाप्पा राठोड (रा. गंधोरा तांडा, ता. तुळजापूर), रेणुका राजेश राठोड आणि राजेश राठोड (दोघे रा. खोपोली, ता. खालापूर, जि. रायगड) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (ता. १६) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास गंधोरा शिवारातील गट क्रमांक २८४ व २८५ मध्ये पवनचक्कीच्या तारा ओढण्याचे काम सुरु होते. उपविभागीय पोलिस अधिकारी आणि तुळजापूरच्या तहसीलदारांनी दिलेल्या आदेशाचे उल्लंघन करत आरोपींनी तिथे प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी पवनचक्कीचे काम करणाऱ्या कामगारांना शिवीगाळ करत दगड व तारेने मारहाण केली आणि त्यांना जखमी केले.

दरम्यान, या घटनेत फिर्यादी शंकर कांबळे व इतर साक्षीदार शासकीय काम करत असताना आरोपींनी त्यांच्या कामातही अडथळा आणला आणि दगडफेक केली. याप्रकरणी शंकर कांबळे यांच्या फिर्यादीवरून तिन्ही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम १३२, १२५, २२३, ११८(१), ११५(२), ३५२, ३(५) अन्वये नळदुर्ग पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास नळदुर्ग पोलिस करत आहेत.


Previous Post

पवनचक्कीच्या तारा चोरणारी टोळी जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई

Next Post

उमाचीवाडीत ६० वर्षीय वृद्धाला बेदम मारहाण; सहा जणांवर गुन्हा दाखल

Next Post
धाराशिव : म्हशीचे वासरू शेतात घुसल्याच्या वादातून दोन गटांत तुंबळ मारामारी; परस्परविरोधी गुन्हे दाखल

उमाचीवाडीत ६० वर्षीय वृद्धाला बेदम मारहाण; सहा जणांवर गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

धाराशिव शहरात पोलिसांची मोठी कारवाई! गोवंश तस्करीचा पर्दाफाश, ११ लाखांचा मुद्देमाल जप्त

कत्तलीसाठी गोवंशीय जनावरांची निर्दयी वाहतूक; धाराशिव पोलिसांची कारवाई, सव्वाचार लाखांचा मुद्देमाल जप्त

March 18, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

भूममध्ये बंद घर फोडले; सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह ९८ हजारांचा मुद्देमाल लंपास

March 18, 2026
धाराशिव : म्हशीचे वासरू शेतात घुसल्याच्या वादातून दोन गटांत तुंबळ मारामारी; परस्परविरोधी गुन्हे दाखल

उमाचीवाडीत ६० वर्षीय वृद्धाला बेदम मारहाण; सहा जणांवर गुन्हा दाखल

March 18, 2026
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

शासकीय कामात अडथळा; पवनचक्कीच्या कामगारांना मारहाण, तिघांवर गुन्हा दाखल

March 18, 2026
पवनचक्कीच्या तारा चोरणारी टोळी जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई

पवनचक्कीच्या तारा चोरणारी टोळी जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई

March 18, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group