• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Thursday, March 5, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

ऑईल टँकरवर नोकरीचे आमिष दाखवून उमरग्यातील तरुणाला २ लाखांना गंडा

रत्नागिरी, बीडच्या दोघांवर गुन्हा

admin by admin
April 11, 2025
in क्राईम
Reading Time: 1 min read
बेंबळी: लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार
0
SHARES
67
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

उमरगा –  ऑईल टँकर जहाजावर नोकरी लावण्याचे आणि ट्रेनिंग पूर्ण झाल्याचे बनावट सर्टिफिकेट काढून देण्याचे आमिष दाखवून उमरगा तालुक्यातील व्हंताळ येथील एका २५ वर्षीय तरुणाला १ लाख ९९ हजार रुपयांना गंडवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी तब्बल १० महिन्यांनंतर तरुणाने दिलेल्या फिर्यादीवरून रत्नागिरी आणि बीड जिल्ह्यातील दोन आरोपींविरुद्ध उमरगा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संदिप माधव मगर (वय २५ वर्षे, रा. व्हंताळ, ता. उमरगा, जि. धाराशिव) असे फसवणूक झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्यांनी गुरुवारी (दि. १० एप्रिल २०२५) उमरगा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, आरोपी तेजस राकेश शिंदे (रा. चैतन्यब्रम्ह अपार्टमेंट, चिपळूण, जि. रत्नागिरी) आणि अजय देवकर (रा. साक्षाळ पिंपरी, ता. गेवराई, जि. बीड) यांनी गेल्या वर्षी १२ जून २०२४ ते २५ जून २०२४ या कालावधीत मोबाईल फोनवरून फिर्यादी संदिप मगर यांच्याशी संपर्क साधला.

आरोपींनी संदिप यांना, “तुला ऑईल टँकर शिपवर (जहाज) कामाला लावतो आणि तुझे ट्रेनिंग झाले आहे, असे सर्टिफिकेट काढून देतो. त्यासाठी एजंटला दोन लाख रुपये द्यावे लागतील,” असे सांगितले. त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून नोकरीच्या आशेने संदिप मगर यांनी आरोपींना एकूण १ लाख ९९ हजार रुपये दिले.

मात्र, पैसे घेतल्यानंतर आरोपींनी संदिप यांना ना ऑईल टँकरवर नोकरी लावली, ना ट्रेनिंगचे कोणतेही सर्टिफिकेट दिले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर संदिप मगर यांनी अखेर गुरुवारी उमरगा पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली.

त्यांच्या फिर्यादीवरून उमरगा पोलिसांनी आरोपी तेजस शिंदे आणि अजय देवकर यांच्या विरोधात भारतीय दंड विधान संहितेच्या कलम ४२० (फसवणूक) आणि ३४ (समान उद्देश) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत असून, अशा प्रकारच्या नोकरीच्या आमिषांना बळी न पडण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Previous Post

कळंब तालुक्यातील डिकसळमध्ये ॲक्टिव्हा विक्रीच्या वादातून मारहाण

Next Post

येरमाळ्यात येडेश्वरी मंदिर परिसरात मटका अड्ड्यांवर पोलिसांचे छापे

Next Post
बेंबळी: लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार

येरमाळ्यात येडेश्वरी मंदिर परिसरात मटका अड्ड्यांवर पोलिसांचे छापे

ताज्या बातम्या

शासकीय योजना लाटण्यासाठी बनावट शिक्के आणि प्रमाणपत्रे

कळंब: पेट्रोल पंपाच्या भागीदारीत तब्बल साडेचार कोटींची फसवणूक; एकावर गुन्हा दाखल

March 3, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

तुळजापूर: पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यानेच लांबवली ९० हजारांची रोकड; एकावर गुन्हा दाखल

March 3, 2026
आमदार राणाजगजितसिंह पाटील : मंत्रिपदाचं स्वप्न आणि ‘मित्र’ची भेट !

धाराशिव झेडपी सत्तापेच: तानाजी सावंतांना डावलण्याचा डाव उलटला, भाजप आमदार राणा पाटलांचे टेन्शन वाढले!

March 3, 2026
एसटीच्या ताफ्यात लवकरच “स्मार्ट बसेस”; प्रवासी सुरक्षेला प्राधान्य – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

“प्रसंगी विरोधात बसू, पण शिवसेनेत फूट पडू देणार नाही!” – पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचा सज्जड इशारा

March 3, 2026
चोराखळी : डोळ्यात चटणी फेकून आणि पिस्तूल-सुऱ्याचा धाक दाखवून कालिका कलाकेंद्र चालकाच्या घरात सशस्त्र दरोडा

चोराखळी : डोळ्यात चटणी फेकून आणि पिस्तूल-सुऱ्याचा धाक दाखवून कालिका कलाकेंद्र चालकाच्या घरात सशस्त्र दरोडा

March 3, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group