• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Tuesday, July 21, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

येरमाळ्यात येडेश्वरी मंदिर परिसरात मटका अड्ड्यांवर पोलिसांचे छापे

दोघांना अटक, रोख रक्कम जप्त

admin by admin
April 11, 2025
in क्राईम
Reading Time: 1 min read
बेंबळी: लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार
0
SHARES
94
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

येरमाळा- येरमाळा येथील प्रसिद्ध येडेश्वरी देवी मंदिर परिसरात सुरू असलेल्या टायगर मटका जुगारावर येरमाळा पोलिसांनी गुरुवारी (दि. १० एप्रिल २०२५) सायंकाळी दोन ठिकाणी छापे टाकून कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी दोघांना अटक केली असून, त्यांच्याकडून रोख रक्कम आणि मटका जुगाराचे साहित्य जप्त केले आहे. याप्रकरणी दोघांविरुद्ध येरमाळा पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येडेश्वरी मंदिर परिसरात मटका जुगार खेळला जात असल्याची गुप्त माहिती येरमाळा पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास मंदिर परिसरात छापा टाकला. यावेळी आश्रुबा अभिमान पवार (वय २६ वर्षे, रा. येरमाळा, ता. कळंब) हा टायगर मटका जुगाराचे साहित्य आणि रोख १,१२० रुपयांसह पोलिसांना मिळून आला. पोलिसांनी तात्काळ रक्कम व साहित्य जप्त करून त्याला ताब्यात घेतले.

त्यानंतर, सायंकाळी सुमारे ६ वाजून ५० मिनिटांनी पोलिसांनी मंदिर परिसरातच दुसऱ्या ठिकाणी छापा टाकला. यावेळी महेश उर्फ चिक्या मधुकर बारकुल (वय २७ वर्षे, रा. सरकारी दवाखान्याजवळ, येरमाळा, ता. कळंब) हा टायगर मटका जुगाराचे साहित्य आणि रोख १,४५० रुपयांसह पोलिसांच्या हाती लागला. त्याच्याकडील रक्कम व साहित्यही पोलिसांनी जप्त केले.

या दोन्ही प्रकरणी पोलिसांनी आरोपी आश्रुबा पवार आणि महेश उर्फ चिक्या बारकुल यांच्या विरोधात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम १२(अ) अन्वये येरमाळा पोलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हे नोंदवले आहेत. मंदिर परिसरात सुरू असलेल्या या अवैध धंद्यांवर कारवाई केल्यामुळे समाधान व्यक्त होत असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.

तुळजाभवानी मंदिर परिसरात मटका अड्ड्यावर छापा; एकास अटक, मुद्देमाल जप्त

तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मंदिराजवळील शासकीय इमारतीच्या बाजूला सुरू असलेल्या कल्याण मटका जुगार अड्ड्यावर तुळजापूर पोलिसांनी गुरुवारी (दि. १० एप्रिल २०२५) सायंकाळी छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली असून, त्याच्याकडून रोख रक्कम आणि मटका जुगाराचे साहित्य जप्त केले आहे.सलमान खय्युम शेख (वय २५ वर्षे, रा. वासुदेव गल्ली, ता. तुळजापूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तुळजाभवानी मंदिर परिसरात शासकीय इमारतीच्या बाजूला कल्याण मटका जुगार खेळला जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे, तुळजापूर पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी ७ वाजून ५ मिनिटांच्या सुमारास सदर ठिकाणी छापा टाकला.

यावेळी आरोपी सलमान शेख हा कल्याण मटका जुगाराचे आकडे घेताना आणि जुगाराचे साहित्य स्वतःच्या ताब्यात बाळगताना रंगेहाथ आढळला. पोलिसांनी त्याच्याकडून रोख रक्कम १,२५० रुपये आणि मटका जुगाराचे साहित्य जप्त केले.

याप्रकरणी पोलिसांनी आरोपी सलमान शेख याच्या विरोधात तुळजापूर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम १२(अ) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. तीर्थक्षेत्र असलेल्या तुळजापूर शहरात, विशेषतः मंदिर परिसरात चालणाऱ्या अशा अवैध धंद्यांवर कडक कारवाई सुरू ठेवणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Previous Post

ऑईल टँकरवर नोकरीचे आमिष दाखवून उमरग्यातील तरुणाला २ लाखांना गंडा

Next Post

उमरग्यात मोठी कारवाई: गावठी पिस्तूल, जिवंत काडतुसे आणि कोयत्यांसह एकाला अटक

Next Post
बेंबळी: लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार

उमरग्यात मोठी कारवाई: गावठी पिस्तूल, जिवंत काडतुसे आणि कोयत्यांसह एकाला अटक

ताज्या बातम्या

धाराशिव : नगरसेवक विलास लोंढे यांच्या अपात्रतेच्या मागणीवरील सुनावणी 4 ऑगस्टला

धाराशिव : नगरसेवक विलास लोंढे यांच्या अपात्रतेच्या मागणीवरील सुनावणी 4 ऑगस्टला

July 21, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

तुळजापूरमध्ये कारची काच फोडून दीड लाखांची रोकड लंपास

July 20, 2026
तरुणांना रोजगाराच्या अनगिनत संधी उपलब्ध करून देणारा अंतरिम अर्थसंकल्प – आ.राणाजगजितसिंह पाटील

धाराशिव लोकसभा मतदारसंघातील 203 नवीन वर्गखोल्यांसाठी 22.19 कोटींचा निधी मंजूर

July 20, 2026
सात वर्षे खासदार झोपले होते का? आयत्या पिठावर रेघोट्या ओढणाऱ्या खासदारांच्या अब्रूचे धिंडवडे

सात वर्षे खासदार झोपले होते का? आयत्या पिठावर रेघोट्या ओढणाऱ्या खासदारांच्या अब्रूचे धिंडवडे

July 19, 2026
धाराशिव साखर कारखाना अधिकाऱ्याची १.१० कोटी रुपयांची फसवणूक; चेअरमनच्या नावाने गंडा

एसबीआय (SBI) बँक खात्याचा वापर करून सायबर दरोडा!

July 19, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!