उमरगा : फिर्यादी नामे- अमोल अशोक कुंभार, वय 32 वर्षे, व्यवसाय- बस चालक, बॅच नं-19825, उमरगा बस आगार, रा. जळकोट ता. तुळजापूर जि. धाराशिव हे लाडवंती येथुन बस क्र एमएच 20 बी.एल. 0857 ही घेवून जात असताना दि. 16.02.2024 रोजी 16.00 वा. सु. एनएच 65 रोडवरील उड्डान पुलावर तुरोरी येथे आरोपी नामे- आदिनाथ माने, 2) किरण पवार, 3) उमाकांत जाधव, रा. तुरोरी ता. उमरगा जि. धाराशिव यांनी व सोबत अनोळखी 20 ते 22 व्यक्तीने बसचे समोर मोटरसायकल घेवून बसकडे येवून बस आडवून बसचा दरवाजा जबरदस्तीने उघडून बसमध्ये चढून बस मधील पॅसेंजरना खाली उतरवले व पेट्रोल सिटवर टाकुन फिर्यादीस व कंडक्टर यांना धक्काबुक्की करुन हाताचापटाने मारहाण करुन आगकाडी ओडून बसला आग लावून संपुर्ण बस जाळून नुकसान केले. अशा मजकुराच्या फिर्यादी- अमोल कुंभार यांनी दि.16.02.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उमरगा पो. ठाणे येथे कलम 308, 435, 341, 143, 147, 149, 427, भा. दं. वि. सं. सह मपोका कलम 37(1), (3) सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंध अधिनियम कलम 3, 5 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
लोहारा : फिर्यादी नामे-शिवाजी विठ्ठल पांचाळ, वय 48 वर्षे, व्यवसाय एस टी बस चालक उमरगा बस डेपो, रा. कास्ती खुर्द ता. लोहारा जि. धाराशिव यांनी बस क्र एमएच 20 बी.एल. 1701 ही दि. 16.02.2024 रोजी 00.15 वा. सु. माकणी बस स्टॅण्ड येथे उभी केलेली असताना अज्ञात इसमांनी बसला पाठीमागून आग लावून जाळून नुकसान केले. अशा मजकुराच्या फिर्यादी-शिवाजी पांचाळ यांनी दि.16.02.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन लोहारा पो. ठाणे येथे कलम 435, भा. दं. वि. सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
जमाव बंदी आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हा दाखल
वाशी :आरोपी नामे- 1)मोहन इंगोले, 2) ॲड प्रकाश नामदेव मोटें, 3) मनोज बाबासाहेब मोटे, 4)महादेव राजराम मोटे, 5) बंडु संतराव मुळे, 6) रघुनाथ दगडु मोटे,7) ज्ञानदेव जगन्नाथ डोके, 8) आखाडे ए.एच. 9) मयुर बाबासाहेब मोटे, 10) बाबुराव बळीराम मोटे, 11) उध्दव मोटे, 12) राहुल रामहरी मोटे, 13) पांडुरंग मोटे, 14) श्रीमंत आखाडे, 15) विष्णुपंत मोटे, 16)अनंता शिराळकर, 17) शिवाजीराव ताटे, 18) आदिनाथ मोटे,19) शिवाजीराव झोडगे, 20) अभिजीत वसंत मोटे, 21) महादेव मोटे, 22) उमेश महाडीक, 23) अक्षय इंगळे, 24) रवी शिनगारे, 25) माउली ताटे, 26) अविनाश इंगळे, व इतर अनोळखी 30 ते 40 इसम यांनी दि.16.02.2024 रोजी 11.00 ते 13.20 वा. सु. पारगाव शिवारातील एनएच 52 रोडवर मा. जिल्हादंडाधिकारी साहेब धाराशिव यांचे जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करुन रास्ता रोको आंदोलन केले तसेच रस्त्याचे मधोमध रोडवर बैलगाडी व ट्रॅक्टर उभे करुन बैलांना रोडवर बांधून त्यांचा छळ करुन त्यांना वेदना वयातना होतील अशा प्रकारे कृत्य केले. अशा मजकुराच्या फिर्यादी- दादाराव शिवाजी औसारे, वय 33 वर्षे, पोलीस अमंलदार/144 नेमणुक-पोलीस ठाणे वाशी यांनी दि.16.02.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन वाशी पो. ठाणे येथे कलम 341, 188, भा.दं.वि.सं. सह मुंबई पोलीस कायदा कलम 119, 135, सह 11(1) (क) प्राण्यांना क्रुरुतेने वागण्यास प्श्रतिबंध अधि 1960 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.