उमरगा : उमरगा तालुक्यातील बोरी मातोळा येथे ओव्हरटेक करताना कार आणि पिकअप पल्टी होवून दोन ठार तर एक जण जखमी झाला. जखमीला उमरगा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे.
मयत आरोपी नामे- दत्तात्रय गोविंद गिरी, व सोबत मयत नामे- निखील नामदेव भोसले रा. बोरी मातोळा ता. उमरगा जि. धाराशिव हे दोघे दि.07.06.2024 रोजी 20.00 वा. सु. इनोव्हा कार क्र एमएच 25 एएल 9007 मधून जात होते. दरम्यान बाबळसुर पाटीजवळ उमरगा ते लातुर जाणारे रोडवर मयत आरोपी नामे- दत्तात्रय गिरी यांनी त्यांचे ताब्यातील कार ही हायगयी व निष्काळजीपणे चालवून समोरील कारला ओव्हरटेक करताना फिर्यादी नामे- रघुनाथ केशव वडदरे, वय 28 वर्षे, रा कराळी ता. उमरगा जि. धाराशिव यांचे पिकअप क्र एमएच 25 एजे 1290 ला उजव्या साईडने धडक दिली. त्यावर पिकअप पल्टी होवून पिकअपचे पाठीमागून येणारे आयशार टेम्पो क्र एमएच 25 बीई 3435 यालापण जोराची धडक लागून अपघात झाला. या अपघातात दत्तात्रय गिरी व निखील भोसले हे गंभीर जखमी होवून मयत झाले. तर आयशर टेम्पो चालक अमीर मुनिर शेख रा. लातुर हे जखमी झाले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- रघुनाथ वडदरे यांनी दि. 13.06.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उमरगा पो ठाणे येथे भा.द.वि.सं. कलम 279, 337, 338, 304 (अ) सह 184 मोवाका अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
चोरीचे दोन गुन्हे दाखल
बेंबळी : मार्च 2024 ते दि. 12.06.2024 रोजी 16.40 वा. सु. निम्न तेरणा उपसा सिंचन योजना टप्पा क्र 5 बामणी येथील पंपग्रहामधील लोखंडी शिडी, 20 फुट 1 लोखंडी प्लॉटफॉर्म, 30 फुट लांबीचा व 3.5 फुट रुंदीचा व नट बोल्ट, खिडकी सुरक्षा जाळी लोखंडी, एक लोखंडी खिडकी, रॅक असा एकुण 60,000₹ किंमतीचा माल अज्ञात व्यक्तीने चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-रामेश्वर व्यंकटी पारवे, वय 27 वर्षे, रा.लोहा ता. लोहारा जि. धाराशिव यांनी दि.13.06.2024 रोजी दिलेल्या पथम खबरेवरुन बेंबळी पो ठाणे येथे भा.द.वि.सं. कलम 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
भुम: फिर्यादी नामे- समाधान वसंत इळे, वय 34 वर्षे, रा. चिंचपुर ढगे ता. भुम जि. धाराशिव यांचे चिंचपुर ढगे ते वालवड रोडवरील वस्तीवरुन अंदाजे 1,55,000₹ किंमतीच्या दोन म्हशी व दोन जर्शी गायी हे दि. 09.06.2024 रोजी 19.30 ते दि. 10.06.2024 रोजी 04.00 वा. सु. अज्ञात व्यक्तीने चोरुन नेल्या अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-समाधान इळे यांनी दि.13.06.2024 रोजी दिलेल्या पथम खबरेवरुन भुम पो ठाणे येथे भा.द.वि.सं. कलम 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.