धाराशिव – गोवंशीय जनावरांची कत्तलीसाठी वाहतुक करणाऱ्या वाहनाविरुद्ध धाराशिव पोलिसांनी जोरदार मोहीम उघडली आहे. पोलिसांनी एक अशोक लेलॅण्ड कंपनीचे मालवाहतुक वाहन पकडून गोवंशीय जातीच्या दोन जर्शी गाय, दोन बैल व एक खोंड, एक कारवड ताब्यात घेतले आहे.
पोलीस ठाणे धाराशिव हद्दीत सोलापूर बायपास रोड कडून भारत विद्यालय ते धाराशिव कडे जाणारे रोडवर धाराशिव येथे अवैधरित्या गोवंशीय जनावरे कत्तलीसाठी एक अशोक लेलॅण्ड कंपनीचे मालवाहतुक वाहन क्र एमएच 03 सीडी 2130 मध्ये निदर्यतेने बांधून घेवून जात आहेत. अशी माहिती मिळाल्यावरुन धाराशिव पोलीस ठाण्याचे बीट मार्शल हे भारत विद्यालय ते धाराशिव कडे जाणारे रोडवर धाराशिव येथे जावून थांबले असता अंदाजे 12.30 वा. सु. तेथुन एक अशोक लेलॅण्ड कंपनीचे मालवाहतुक वाहन क्र एमएच 03 सीडी 2130 येत असल्याचे बीट मार्शलचे अंमलदार यांना दिसले.
या अशोक लेलॅण्ड कंपनीचे मालवाहतुक वाहन थांबवून. सदरील अशोक लेलॅण्ड कंपनीचे मालवाहतुक वाहन क्र एमएच 03 सीडी 2130 चे निरीक्षण केले असता त्यामध्ये गोवंशीय जनावरे दिसुन आली. सदरील वाहन चालकास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव- बिलाल अखबर कुरेशी, वय 27 वर्षे, रा. मोमीन गल्ली भुम ता. धाराशिव, व सोबत बाबा मुजावर रा. खाजानगर धाराशिव ता. जि. धाराशिव असे सागिंतले.
नमुद अशोक लेलॅण्ड वाहना मध्ये गोवंशीय जातीच्या 2 जर्शी गाय, दोन बैल व एक खोंड, एक कारवड अंदाजे 1,00,000 ₹ किंमतीचे वाहनासह असे एकुण 3,25,000 ₹ किंमतीचे जनावरे व वाहन मिळून आले. सदरील गोवंशीय जनावरांना वाहनांमध्ये दाटीवाटीने भरण्यात आले होते. या गोवंशीय जनावरांना गाडीमध्ये हालचाल करण्यासाठी पर्याप्त जागा नव्हती. अत्यंत त्रासदायक पध्दतीने दाटीवाटीने भरुन अवैध रित्या कत्तल करणेसाठी त्यांची वाहतुक करण्यात येत होती. यावरुन नमुद आरोपीविरुध्द पोलीस ठाणे धाराशिव शहर येथे गुन्हा नोंदणी क्रमांक 266/2024 महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1995 चे कलम 5(अ), प्राण्याच्या निर्दयतेने वागविण्यात प्रतिबंध कायदा कलम 11(1) (बी) अन्वये गुन्हा नोदंवला आहे.