उमरगा : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी कवठ्यात राज्य सरकारच्या प्रतिकात्मक पुतळृयाची अंतयात्रा काढणाऱ्या विनायकराव पाटील यांच्यासह ११ जणांविरुद्ध उमरगा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
1) विनायकराव आनंदराव पाटील,2) विकास चंद्कांत पाटील, 3)नितीन आण्णाराव पाटील, 4)दिगंबर यादव सोनवणे, 5) विजयकुमार धोंडीराम सोनवणे, 6) जगन्नाथ नामदेव पाटील, 7)मुकुंद बाबुराव माने, 8) रमेश पांडुरंग माने, 9) भागवत धोंडीराम सोनवणे,10) सविता दिनकर मोरे, 11) अलका पांडुरंग माने, यांनी दि. 01.11.2023 रोजी 09.30 वा. सु. कवठा येथील लायन्स क्लब मंगल कार्यालयाचे प्रांगणात व राज्य रस्ता क्र एनएच 548 बी उमरगा ते लातुर रोडवर जिल्हादंडाधिकारी यांचे आदेश क्र जा.क्र फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144(2) जा. क्र 2023 उपचिटणीस/एमएजी-3 सी.आर दि. 30.10.2023 अन्वयेचे उल्लंघन करुन उपोषण ठिकाणापासून राज्य सरकारच्या प्रतिकात्मक पुतळृयाचे अंतयात्रा काढून ती गावातील प्रमुख मार्गावरुन कवठा पाटीपर्यंत वाहतुक आडवून आंदोलन करुन राज्य सरकारच्या पुतळ्याचे दहन केले. यावरुन पोलीसांनी नमूद व्यक्तींविरुध्द भा.द.वि.स. कलम- 341, 143, 188 सह महाराष्ट पोलीस कायदा कलम 135 अन्वये उमरगा पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.