धाराशिव : मयत नामे- अर्जुन रामहारी झिंजुरके, वय 52 वर्षे, सोबत 2) बशीर शमशेर खॉ शेख वय 75 दोघे रा. माजलगाव ता. माजलगाव जि. बीड हे दोघे दि.20.10.2023 रोजी 16.30 वा. सु. मोटरसायकल वरुन तुळजापूर ते माजलगाव जात होते. दरम्यान पिकअप क्श्र एमएच 23 एयु 0760 च्या चालकाने त्याचे ताब्यातील पिकअप ही हायगई व निष्काळजी पणे अतीवेगाने चालवून अर्जुन यांचे मोटरसायकलला धडक दिली.
या अपघातात अर्जुन रामहारी झिंजुरके, बशीर शमशेर खॉ शेख हे दोघे गंभीर जखमी होवून मयत झाले. तसेच नमुद पिकअप चालक हा आपघाताची माहिती न देता वाहनासह पसार झाला. अशा मजकुराच्या फिर्यादी ज्ञानेश्वर रामहारी झिंजुरके, वय 54 वर्षे, रा. मठ गल्ली, माजलगाव ता. माजलगाव जि. बीड यांनी दि.0 1.11.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम- 279, 304 (अ) सह मो. वा. कायदा कलम134 (अ) (ब), 184अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
मारहाण
ढोकी :आरोपी नामे- 1)समाधान अनंत शिंदे, 2)महेश बाळासाहेब शिंदे, 3)शुभम बाबासाहेब घुटे, 4)अजय बालाजी शिंदे सर्व रा. आरणी ता. जि. धाराशिव यांनी दि. 31.10.2023 रोजी 12.30 वा.सु. आरणी शिवारातील शेतात फिर्यादी नामे- शुभम किसन गरड, वय 28 वर्षे, रा. जागजी ता. जि. धाराशिव हे आप्पा पवार यांचे शेताकडे जात असताना त्यास नमुद आरोपींनी थांबवून आमचे गाडीला कट का मारला असे म्हणून शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, लोखंडी दाताळाने मारहाण करुन जखमी केले. फिर्यादी यांचा विवो कंपनीचा मोबाईल दगडाने फोडून नुकसान केले. अशा मजकुराच्या फिर्यादी- शुभम गरड यांनी दि.01.11.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन ढोकी पो. ठाणे येथे कलम 427, 341, 324, 323, 504, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.