• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Sunday, September 20, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिव नगर पालिकेतील कथित २७ कोटीच्या गैरव्यवहार प्रकरणी आनंदनगर पोलीस निष्क्रिय

तपास आर्थिक गुन्हे शाखा किंवा स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्याची आ.धस यांची मागणी

admin by admin
November 3, 2023
in धाराशिव शहर
Reading Time: 1 min read
धाराशिव नगर पालिकेतील कथित २७ कोटीच्या गैरव्यवहार प्रकरणी आनंदनगर पोलीस निष्क्रिय
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव – धाराशिव नगर पालिकेतील कथित २७ कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणी तत्कालीन निलंबित मुख्याधिकारी हरिकल्याण जनार्धन येलगट्टे यांच्यासह तीन जणांवर आनंदनगर पोलीस स्टेशनमध्ये १४ ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी येलगट्टे यांना पोलिसांनी अटक केली असली तरी बोर्डे आणि पवार अद्याप मोकाट आहेत. आरोपी आणि पोलीस यांच्यात ‘अर्थपूर्ण’ बोलणी झाल्याने पोलीस आरोपीना अटक करण्याचे धाडस करत नसल्याची चर्चा सुरु आहे.

धाराशिव नगर पालिकेतील कथित २७ कोटीच्या गैरप्रकरणी आनंदनगर पोलीस निष्क्रिय ठरल्याने हे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखा किंवा स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करून आरोपींना तात्काळ अटक करावी, अशी मागणी आ. सुरेश धस यांनी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे. तसेच येत्या हिवाळी अधिवेनात विधान परिषदेत तारांकित प्रश्न उपस्थित केला आहे. त्यामुळे आनंदनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रवीणकुमार बांगर अडचणीत आले आहेत.

काय आहे प्रकरण ?

आरोपी नामे- हरिकल्याण जनार्धन येलगट्टे, तत्कालीन मुख्याधिकारी, नगर परिषद उस्मानाबाद 2) सुरज संपत बोर्डे तत्कालीन लेखापाल, 3) प्रशांत विक्रम पवार तत्कालीन अंतर्गत लेखापरिक्षक सर्व रा. उस्मानाबाद यांनी दि.06.07.2020 ते दि.21.11.2022 पावेतो नगर परिषद उस्मानाबाद येथे एकुण 1088 प्रमाणके शासकीय अभिलेख आहे. हे माहित असताना व ते लेखाविभागात जतन करुन ठेवणे बंधनकारक असताना ती ठेवली नाहीत आणिक विविध विकास योजना व इतर आनुषंगीक खर्चाबाबतचे एकुण 514 प्रमाणके ज्याची एकुण 27,38,78,100 ₹ रक्कमेचा अपहार करुन तो दडपण्याच्या उद्देशाने प्रमाणके जाणिवपुर्वक लेखाविभागात ठेवले नाहीत अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- अशोक कलेश्वर फरताडे, वय 31 वर्षे, धंदा लेखापाल नगर परिषद उस्मानाबाद रा.मस्सा खंडेश्वरी ता. कळंब जि. उसृमानाबाद हा.मु. समर्थ नगर उस्मानाबाद ता. जि. उस्मानाबाद यांनी दि.14.08.2023 रोजी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पो ठाणे येथे भा. दं. वि. सं. कलम- 420, 409, 34, 201 सह महाराष्ट्र सार्वजनिक अभिलेख अधि कलम 9 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

बोर्डे, पवार अद्याप फरार , पोलीस थंड

धाराशिव नगर पालिकेतील कथित २७ कोटीच्या गैरव्यवहार प्रकरणी आरोपी असलेले सुरज संपत बोर्डे ( तत्कालीन लेखापाल ) प्रशांत विक्रम पवार ( तत्कालीन अंतर्गत लेखापरिक्षक ) यांना आनंदनगर पोलीस अटक करीत नसल्याने पोलीस आणि आरोपीचे साटेलोटे असल्याचा आरोप केला जात आहे. एकीकडे पोलीस निरीक्षक प्रवीणकुमार बांगर सर्वच प्रकरणात निष्क्रिय ठरलेले असताना, दुसरीकडे स्थानिक गुन्हे शाखा मिळवण्यासाठी त्यांनी जोरदार फिल्डिंग लावली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक यशवंत जाधव हे सेवानिवृत्त झाल्यामुळे या जागेसाठी बांगर यांनी बीडच्या एका राजकीय नेत्याच्या माध्यमातून वशिला लावला आहे. अश्या निष्क्रिय पोलीस निरीक्षकाला पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी हे स्थानिक गुन्हे शाखेची खुर्ची देणार का ? याकडे लक्ष वेधले आहे.

Previous Post

धाराशिवजवळ मोटारसायकल पिकअपची धडक , दोन ठार

Next Post

वगळलेल्या 17 मंडळातील शेतकऱ्यांच्या खात्यावर दिवाळीपुर्वी अग्रीम जमा करा

Next Post
उर्जा विभागाने तुघलकी निर्णय घेऊ नये – आ. कैलास पाटील

वगळलेल्या 17 मंडळातील शेतकऱ्यांच्या खात्यावर दिवाळीपुर्वी अग्रीम जमा करा

ताज्या बातम्या

आडातच नाही पाणी, तर पोहऱ्यात कुठून येणार? नळदुर्गला १० दिवसाआड पाणी अन् साहेबांचे ‘जलपूजनाचे’ नाटक!

आडातच नाही पाणी, तर पोहऱ्यात कुठून येणार? नळदुर्गला १० दिवसाआड पाणी अन् साहेबांचे ‘जलपूजनाचे’ नाटक!

September 20, 2026
‘उतावळा नवरा, गुडघ्याला बाशिंग’: कैलास पाटलांचा बैठकीत दणका अन् फेसबुक पिंट्याची थेट ‘दुष्काळ’ घोषणा!

‘उतावळा नवरा, गुडघ्याला बाशिंग’: कैलास पाटलांचा बैठकीत दणका अन् फेसबुक पिंट्याची थेट ‘दुष्काळ’ घोषणा!

September 19, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

उंडेगाव : दुचाकी अडवून “माझ्या आईला का बोलावतोस?” विचारत चाकूहल्ला; ४५ वर्षीय इसम गंभीर जखमी

September 19, 2026
भाटसांगवी पाटीजवळ स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई; गावठी पिस्तूल व जिवंत काडतुसासह एकास रंगेहात पकडले

भाटसांगवी पाटीजवळ स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई; गावठी पिस्तूल व जिवंत काडतुसासह एकास रंगेहात पकडले

September 19, 2026
तेरखेडा फटाका उद्योगाला दणका; ‘भवानी फायर वर्क्स’चे उत्पादन जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशापर्यंत बंद!

तेरखेडा फटाका उद्योगाला दणका; ‘भवानी फायर वर्क्स’चे उत्पादन जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशापर्यंत बंद!

September 19, 2026

Recent Posts

  • आडातच नाही पाणी, तर पोहऱ्यात कुठून येणार? नळदुर्गला १० दिवसाआड पाणी अन् साहेबांचे ‘जलपूजनाचे’ नाटक!
  • ‘उतावळा नवरा, गुडघ्याला बाशिंग’: कैलास पाटलांचा बैठकीत दणका अन् फेसबुक पिंट्याची थेट ‘दुष्काळ’ घोषणा!
  • उंडेगाव : दुचाकी अडवून “माझ्या आईला का बोलावतोस?” विचारत चाकूहल्ला; ४५ वर्षीय इसम गंभीर जखमी
  • भाटसांगवी पाटीजवळ स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई; गावठी पिस्तूल व जिवंत काडतुसासह एकास रंगेहात पकडले
  • तेरखेडा फटाका उद्योगाला दणका; ‘भवानी फायर वर्क्स’चे उत्पादन जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशापर्यंत बंद!
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!