उमरगा : आरोपी नामे-1)श्याम विठ्ठल धनेराव रा बेटजवळगा ता. उमरगा जि. धाराशिव यांनी दि.24.04.2024 रोजी 19.30 वा. सु. बेटजवळगा गावात बौध्द विहाराच्या समोर फिर्यादी नामे- शाहुराज अभिमान्यु गायकवाड, वय 40 वर्षे,रा. बेटजवळगा ता. उमरगा जि. धाराशिव यांना नमुद आरोपीने रिक्षाचे भाडे जास्त घेतल्याचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, दाडी करण्याचे ब्लेडने डोक्यात मारहाण करुन जखमी केले.व बसलेला बाकडा पायावर टाकुन तुला बघुन घेतो अशी धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- शाहुराज गायकवाड यांनी दि.25.04.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उमरगा पो. ठाणे येथे 324, 323, 504, 506 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
लोहारा : आरोपी नामे-1)सुरेश दत्तु माने, रा. मुर्शदपुर ता. लोहारा जि. धाराशिव यांनी दि. 19.04.2024 रोजी 14.00 वा.सु. मुर्शदपुर येथे फिर्यादी नामे- अनिता तानाजी माने, वय 45 वर्षे, रा. मुर्शदपुर ता. लोहारा जि. धाराशिव यांना व त्यांचे पती तानाजी माने यांना नमुद आरोपीने घरात घुसुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, दगडाने मारहाण करुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-अनिता माने यांनी दि.25.04.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन लोहारा पो. ठाणे येथे 452,324, 323,504, 506 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
मुरुम : आरोपी नामे-1)शिवराज जगन्नाथ सोलंकर र. अचलेर त. लोहारा जि. धाराशिव यांनी दि.23.04.2024 रोजी21.30 वा. सु. अचलेर ता. लोहारा जि. धाराशिव येथे फिर्यादी नामे-संदीप बळवंत उपासे, वय 24 वर्षे, रा. अचलेर ता. लोहारा जि. धाराशिव यांना नमुद आरोपीने दारु पिवून येवून शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, काठीने डोक्यात मारहाण करुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली.अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- संदीप उपासे यांनी दि.25.04.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन मुरुम पो. ठाणे येथे 324, 323, 504, 506 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
तुळजापूर : आरोपी नामे-1)रोहीत क्षिरसागर रा. अपसिंगा त. तुळजापूर व इतर दोन इसम यांनी दि.25.04.2024 रोजी 11.40 वा. सु. तुळजापूर अपसिंगा रोडवरती असलेले चहाचे हॉटेल समोर फिर्यादी नामे- विशाल जालिंदर कांबळे, वय 49 वर्षे, व्यवसाय नोकरी रा. शाहुनगर काकडे प्लॉट धाराशिव यांना नमुद आरोपींनी परस्पर इलेक्ट्रीक खांब का उभा केले या कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, काठीने मारहाण करुन जखमी केले. व तु ड्युटी कसा करतो अशी धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- विशाल कांबळे यांनी दि.25.04.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो. ठाणे येथे 324, 323, 504, 506,34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
उमरगा : आरोपी नामे-1)विलास काशीबुवा पुरी, 2) सचिन विलास पुरी, 3) वंदना सचिन पुरी सर्व रा. माडज ता. उमरगा जि. धाराशिव यांनी दि. 24.04.2024 रोजी 21.30 वा. सु. माडज येथे फिर्यादी नामे बालाजी विलास पुरी, वय 37 वर्षे, रा. माडज ता. उमरगा जि. धाराशिव स्टॅम्पवर शेत लिहुन का मागतो या करणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, काठीने मारहाण करुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- बालाजी पुरी यांनी दि.25.04.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उमरगा पो. ठाणे येथे 324, 323, 504, 506, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.