उमरगा :आरोपी नामे-1)महेश दाते रा. उमरगा व इतर पाच इसम यांनी दि. 11.05.2024 रोजी 20.00 वा. सु. उमरगा येथे सुविधा हॉस्पीटलच्या गेटचे बाजूला रोडवर फिर्यादी नामे- अमृंत अनिल पाटील, वय 21 वर्षे, रा. कोळसुर क. ता. उमरगा जि. धाराशिव हे सुविधा हॉस्पीटलच्या गेटचे बाजूला उभा होते. दरम्यान आरोपी यांची मोटरसायकल स्लीप होवून खाली पडल्याने असता फिर्यादीने त्यांच्याकडे पाहील्याचे कारणावरुन नमुद आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवून शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, फरसीच्या तुकड्याने डोक्यात मारुन जखमी केले.व तुला बघुन घेतो अशी धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- अमृंत पाटील यांनी दि.12.05.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उमरगा पो. ठाणे येथे 324, 323, 504, 506,143, 147, 148, 149 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
तुळजापूर :आरोपी नामे-1) भरत लिंबाजी गायकवाड,2) अजित भरत गायकवाड, दोघे रा. वडगाव लाख ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि. 09.05.2024 रोजी 08.30 वा. सु. वडगाव लाख शिवार शेत गट नं 269/1 येथे फिर्यादी नामे-अरविंद महादेव गायकवाड, वय 51 वर्षे, रा. वडगाव लाख ता. तुळजापूर जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी जमीनीच्या वाटणीच्या कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, लोखंडी सळई, मारहाण करुन गंभीर जखमी केले. तसेच फिर्यादीचा मुलगा अनुज अरविंद गायकवाड हे भांडण सोडवण्यास आला असता त्यासही नमुद आरोपींनी शिवीगाळ करुन घातक हत्याराने मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- अरविंद गायकवाड यांनी दि.12.05.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो. ठाणे येथे 326, 323, 504, 506,34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
लैंगीक अत्याचार
धाराशिव : एका गावातील एक 28 वर्षीय मुलगी (नाव- गाव गोपनीय) फेब्रुवारी ते दि. 06.03.2024 रोजी पर्यंत तीस लग्नाचे आमिष दाखवून एका 33 वर्षीय तरुणाने तीच्यावर वेगवेगळ्या ठिकाणी वारंवार लैंगीक अत्याचार केला. तसेच घडल्या प्रकाराची कोठे वाच्यता केल्यास त्याने तीला ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या पिडीतीने दि. 12.05.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम-376, 376(2)(एन), 323, 504, 506, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.