• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Sunday, September 13, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

३६ महसूल मंडळांतील शेतकऱ्यांना पीक विमा भरपाई द्या

 ओमराजे निंबाळकरांचा लोकसभेत प्रश्न

admin by admin
August 9, 2026
in शेती - शेतकरी
Reading Time: 1 min read
तरुणांना रोजगाराच्या अनगिनत संधी उपलब्ध करून देणारा अंतरिम अर्थसंकल्प – आ.राणाजगजितसिंह पाटील
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव : धाराशिव लोकसभा मतदारसंघातील ३६ महसूल मंडळांमधील पात्र शेतकऱ्यांना २०२५ खरीप हंगामाची पीक विमा नुकसानभरपाई तातडीने मिळावी, अशी मागणी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी केली आहे. त्यांनी नियम ३७७ अंतर्गत हा गंभीर प्रश्न लोकसभेत दाखल केला आहे.

धाराशिव लोकसभा मतदारसंघात धाराशिव, सोलापूर आणि लातूर जिल्ह्यांतील विविध महसूल मंडळांचा समावेश आहे. या भागातील शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत २०२५ च्या खरीप हंगामासाठी नियमानुसार पीक विमा भरला होता. मात्र, संबंधित पीक विमा कंपनीच्या प्रक्रियेत काही महसूल मंडळांना पीक विमा दावा व नुकसानभरपाईच्या प्रक्रियेतून वगळण्यात आल्याने हजारो पात्र शेतकरी भरपाईपासून वंचित राहिल्याचा मुद्दा खासदार निंबाळकर यांनी उपस्थित केला आहे.

यामध्ये धाराशिव जिल्ह्यातील धाराशिव ग्रामीण, आंबेजवळगा, पाडोळी, जेवळी, धानोरी, माकणी, अनाळा, शेलगाव, जवळा, पाचपिंपळा, सोनारी, आसू, शिराढोण आणि वाशी या महसूल मंडळांचा समावेश आहे.

तसेच सोलापूर जिल्ह्यातील बार्शी, खांडवी, आगळगाव, पांगरी, सुरडी, पानगाव, वैराग, नारी, उपळे दुमाला, सौंदरे आणि गौडगाव, तर लातूर जिल्ह्यातील कासारसिरशी, कासरबालकुंदा, भूतमुगळी, मदनसुरी, मातोळा, किन्नीथोट, किल्लारी, उजनी, लामजना आणि औसा या महसूल मंडळांतील शेतकरी या प्रश्नामुळे प्रभावित झाले आहेत.

पीक विमा योजनेचा मुख्य उद्देश नैसर्गिक आपत्ती, अतिवृष्टी, दुष्काळ, अवकाळी पाऊस, गारपीट आणि प्रतिकूल हवामानामुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक आधार देणे हा आहे. मात्र, शेतकऱ्यांनी विमा भरूनही केवळ तांत्रिक प्रक्रियेतील त्रुटींमुळे संपूर्ण महसूल मंडळाला नुकसानभरपाईच्या प्रक्रियेबाहेर ठेवले जात असेल, तर त्याचा थेट आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसतो, असे निंबाळकर यांनी लोकसभेत मांडलेल्या प्रश्नात नमूद केले आहे.

‘शेतकऱ्यांनी विमा भरला, पिकांचे नुकसान झाले आणि तरीही भरपाई मिळाली नाही’, ही परिस्थिती गंभीर आहे. विमा कंपनीच्या तांत्रिक प्रक्रियेतील त्रुटींचा भार शेतकऱ्यांवर टाकता कामा नये, अशी भूमिका खासदार ओमराजे निंबाळकर यांनी घेतली आहे.

या प्रकरणात केंद्र सरकारने तातडीने हस्तक्षेप करून संबंधित पीक विमा कंपनीच्या माध्यमातून वरील सर्व महसूल मंडळांतील पात्र शेतकऱ्यांना २०२५ खरीप हंगामाची पीक विमा नुकसानभरपाई तातडीने मिळवून द्यावी, अशी मागणी नियम ३७७ अंतर्गत करण्यात आली आहे.

याशिवाय, संबंधित महसूल मंडळांना पीक विमा दावा व नुकसानभरपाईच्या प्रक्रियेतून वगळण्यामागील कारणांची सखोल चौकशी करावी. विमा कंपनीच्या तांत्रिक प्रक्रियेतील त्रुटींमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले असल्यास संबंधितांची जबाबदारी निश्चित करून आवश्यक कारवाई करावी, अशी मागणीही निंबाळकर यांनी केली आहे.

शेतकऱ्यांनी भरलेल्या पीक विम्याचा त्यांना योग्य लाभ मिळावा आणि तांत्रिक कारणांमुळे कोणताही पात्र शेतकरी नुकसानभरपाईपासून वंचित राहू नये, यासाठी खासदार ओमराजे निंबाळकर यांनी लोकसभेत हा प्रश्न उपस्थित केला आहे.

Previous Post

कळंब बसस्थानकात महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठन लंपास

Next Post

धाराशिव कृषी निविष्ठा घोटाळा: १४ अधिकाऱ्यांचे निलंबन, मात्र २९ शेतकरी उत्पादक आणि २ निर्मिती कंपन्यांना ‘राजाश्रय’

Next Post
धाराशिव कृषी निविष्ठा घोटाळा : कोणते अधिकारी निलंबित?

धाराशिव कृषी निविष्ठा घोटाळा: १४ अधिकाऱ्यांचे निलंबन, मात्र २९ शेतकरी उत्पादक आणि २ निर्मिती कंपन्यांना 'राजाश्रय'

ताज्या बातम्या

ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

आळणी येथे दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयता, कत्ती व पिस्तुलाचा वापर, तीन वेगवेगळ्या गुन्ह्यांची नोंद

September 13, 2026
मुरुम येथील खून प्रकरणाचा ४८ तासांत उलगडा; जुन्या वैमनस्यातून कृत्य, एका आरोपीला अटक

बुकनवाडीत थरार : चौकातून दुचाकी नेण्याच्या वादातून २४ वर्षीय तरुणाचा पोटात धारदार शस्त्र खुपसून खून; ५ जण गंभीर

September 13, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

हिंगळजवाडी : शेतातील गवत व झुडपे काढण्यावरून ७५ वर्षीय वृद्धावर कुऱ्हाड अन् खोऱ्याने प्राणघातक हल्ला; ५ जणांवर ढोकी पोलिसांत गुन्हा दाखल

September 12, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

पश्चिम लोहटा : ग्रामपंचायतीत रोजगार सेवकाच्या बाजूने हात वर केल्याने ग्रामस्थाला मारहाण; ८ जणांवर शिराढोण पोलिसांत गुन्हा दाखल

September 12, 2026
धाराशिव जिल्ह्यात लैंगिक अत्याचाराच्या तीन घटना उघडकीस; लोहारा, नळदुर्ग, बेंबळी येथे गुन्हे दाखल

भूम : १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा जबरदस्तीने लावला बालविवाह; पीडिता गर्भवती, पतीसह नातेवाइकांवर पोक्सो अन् बालविवाह प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल

September 12, 2026

Recent Posts

  • आळणी येथे दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयता, कत्ती व पिस्तुलाचा वापर, तीन वेगवेगळ्या गुन्ह्यांची नोंद
  • बुकनवाडीत थरार : चौकातून दुचाकी नेण्याच्या वादातून २४ वर्षीय तरुणाचा पोटात धारदार शस्त्र खुपसून खून; ५ जण गंभीर
  • हिंगळजवाडी : शेतातील गवत व झुडपे काढण्यावरून ७५ वर्षीय वृद्धावर कुऱ्हाड अन् खोऱ्याने प्राणघातक हल्ला; ५ जणांवर ढोकी पोलिसांत गुन्हा दाखल
  • पश्चिम लोहटा : ग्रामपंचायतीत रोजगार सेवकाच्या बाजूने हात वर केल्याने ग्रामस्थाला मारहाण; ८ जणांवर शिराढोण पोलिसांत गुन्हा दाखल
  • भूम : १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा जबरदस्तीने लावला बालविवाह; पीडिता गर्भवती, पतीसह नातेवाइकांवर पोक्सो अन् बालविवाह प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!