आंबी : फिर्यादी नामे- अशोक देवराव साळुंखे, वय 53 वर्षे, व्यवसाय तंत्रज्ञ म. रा.वि.वि.क. शाखा शेळगाव ता. परंडा रा. पाथ्रुड ता. भुम जि. धाराशिव हे व त्यांचे सहकारी दि. 15.03.2024 रोजी 10.30 वा. सु. काळेवाडी येथे वीज बील वसुलीचे काम करत असताना गोपीनाथ नवनाथ वाणी यांचे घराजवळ आले असता त्यांनी पोलवर टाकलेला अकडा काढत असतान नमुद आरोपी नामे- गोपीनाथ नवनाथ वाणी रा. काळेवाडी ता. परंडा जि. धाराशिव यांनी अकडा करडण्याचे कारणावरुन नमुद आरोपीने फिर्यादी व त्यांचे सहकारी यांच्याशी हुज्जत घालून, अरेरावीची, असभ्य भाषा करुन वाद घालून शिवीगाळ करुन काठीने मारुन जखमी केले. तसेच शासकीय कामात अडथळा निर्माण केला. यावरुन अशोक साळुंखे यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि. सं. कलम- 353, 324, 323, 504, सह भा.वि.का. कलम 135 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
आग लावून नुकसान
येरमाळा :फिर्यादी नामे- तानाजी पांडुरंग तौर, वय 62 वर्षे, रा. वाघोली ता. कळंब जि. धाराशिव यांचे वाघोली शिवारातील शेत गट नं 683, मधील 4 एकर उस, 1 एकर ठिबक सिंचन सेट, शेत तळ्यातील प्लॅस्टीकचे कापड, स्पिंकलर सेट इत्यादी साहित्य अज्ञात व्यक्तीने दि. 13.03.2024 रोजी 13.00 वा. सु. आग लावून पेटवून देवून जाळून टाकून तानाजी तौर यांचे नुकसान केले. अशा मजकुराच्या फिर्यादी तानाजी तौर यांनी दि.15.03.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन येरमाळा पो. ठाणे येथे 435 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.