• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Tuesday, September 22, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

परंडा: शेतजमिनीच्या वादातून दाम्पत्याला जबर मारहाण

ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न, ७ जणांवर गुन्हा दाखल

admin by admin
April 13, 2025
in क्राईम
Reading Time: 1 min read
बेंबळी: लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

परंडा – तालुक्यातील सरणवाडी शिवारात शेतीच्या जुन्या वादातून एका दाम्पत्याला गैरकायदेशीर जमाव जमवून शिवीगाळ करत काठीने व लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. इतकेच नव्हे तर, महिलेच्या अंगावर ट्रॅक्टर घालून जीवे मारण्याचा प्रयत्नही करण्यात आला. घटनेनंतर सुमारे अडीच महिन्यांनी याप्रकरणी परंडा पोलीस ठाण्यात सात जणांविरुद्ध गंभीर कलमांखाली गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अनिता बाळासाहेब होरे (वय ४२ वर्षे, रा. पिंपळवाडी, ता. परंडा) यांनी १२ एप्रिल २०२५ रोजी परंडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, ३० जानेवारी २०२५ रोजी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास सरणवाडी शिवारातील शेत गट नंबर १०० मध्ये फिर्यादी अनिता होरे व त्यांचे पती असताना ही घटना घडली.

आरोपी तानाजी सुखदेव सांगडे, रोहिण तानाजी सांगडे, शिवाजी सुखदेव सांगडे, सुखदेव एकनाथ सांगडे, महानंदा सुखदेव सांगडे (सर्व रा. सरणवाडी, ता. परंडा), संतोष दिगंबर होरे (रा. पिंपळवाडी, ता. परंडा) आणि अमोल काकडे (रा. ब्रम्हगाव, ता. परंडा) यांनी संगनमत करून गैरकायद्याची मंडळी जमवली. त्यांनी शेतीच्या वादाच्या कारणावरून फिर्यादी अनिता होरे व त्यांच्या पतीला शिवीगाळ केली. तसेच, लाथाबुक्क्यांनी आणि काठीने जबर मारहाण करून गंभीर जखमी केले.

यानंतरही आरोपी थांबले नाहीत, त्यांनी फिर्यादी अनिता होरे यांच्या अंगावर ट्रॅक्टर घालून त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आणि जीवे मारण्याची धमकी दिली, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या फिर्यादीवरून परंडा पोलिसांनी सातही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १०९, ७४, ७६, ३२६ (एफ), ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२), १८९(२), १८९(३), १९१(२),(३), १९० अन्वये (प्राणघातक हल्ल्याचा प्रयत्न, गंभीर दुखापत, गैरकायदेशीर जमाव, धमकी देणे इत्यादी) गुन्हा नोंदवला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Previous Post

कळंब: भावाला दारू पाजल्याच्या रागातून लोखंडी गजाने मारहाण, एकावर गुन्हा दाखल

Next Post

कत्तलीसाठी गोवंशाची निर्दयी वाहतूक; येरमाळा पोलिसांची कारवाई, टेम्पोसह ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

Next Post
भूम : कत्तलीसाठी गायींची बेकायदेशीर वाहतूक; ४.७५ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघांवर गुन्हा दाखल

कत्तलीसाठी गोवंशाची निर्दयी वाहतूक; येरमाळा पोलिसांची कारवाई, टेम्पोसह ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

ताज्या बातम्या

धाराशिवमध्ये वाद पेटला! ZP अध्यक्षांच्या हट्टापायी उभारलेली ‘ती’ वादग्रस्त भिंत ठाकरे सेनेने पाडली

धाराशिवमध्ये वाद पेटला! ZP अध्यक्षांच्या हट्टापायी उभारलेली ‘ती’ वादग्रस्त भिंत ठाकरे सेनेने पाडली

September 22, 2026
देशी बनावटीचे पिस्तूल व जिवंत काडतुसांसह दोन अट्टल गुन्हेगार जेरबंद

देशी बनावटीचे पिस्तूल व जिवंत काडतुसांसह दोन अट्टल गुन्हेगार जेरबंद

September 22, 2026
शिवसेना (उबाठा) आक्रमक: अंबादास दानवेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालत भाजपच्या ‘जोडे मारो’ आंदोलनाला चोख प्रत्युत्तर

उद्घाटनाचा नारळ फुटला, पाणी मात्र गायब; दानवेंनी विचारताच ‘राणा दादां’ना झोंबली मिरची!

September 21, 2026
शिवसेना (उबाठा) आक्रमक: अंबादास दानवेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालत भाजपच्या ‘जोडे मारो’ आंदोलनाला चोख प्रत्युत्तर

शिवसेना (उबाठा) आक्रमक: अंबादास दानवेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालत भाजपच्या ‘जोडे मारो’ आंदोलनाला चोख प्रत्युत्तर

September 21, 2026
आडातच नाही पाणी, तर पोहऱ्यात कुठून येणार? नळदुर्गला १० दिवसाआड पाणी अन् साहेबांचे ‘जलपूजनाचे’ नाटक!

आडातच नाही पाणी, तर पोहऱ्यात कुठून येणार? नळदुर्गला १० दिवसाआड पाणी अन् साहेबांचे ‘जलपूजनाचे’ नाटक!

September 20, 2026

Recent Posts

  • धाराशिवमध्ये वाद पेटला! ZP अध्यक्षांच्या हट्टापायी उभारलेली ‘ती’ वादग्रस्त भिंत ठाकरे सेनेने पाडली
  • देशी बनावटीचे पिस्तूल व जिवंत काडतुसांसह दोन अट्टल गुन्हेगार जेरबंद
  • उद्घाटनाचा नारळ फुटला, पाणी मात्र गायब; दानवेंनी विचारताच ‘राणा दादां’ना झोंबली मिरची!
  • शिवसेना (उबाठा) आक्रमक: अंबादास दानवेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालत भाजपच्या ‘जोडे मारो’ आंदोलनाला चोख प्रत्युत्तर
  • आडातच नाही पाणी, तर पोहऱ्यात कुठून येणार? नळदुर्गला १० दिवसाआड पाणी अन् साहेबांचे ‘जलपूजनाचे’ नाटक!
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!