• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Thursday, July 16, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

परंड्यात ड्रग्स माफियांविरोधात कारवाईची मागणी; बार्शी पोलिसांकडून चार पेडलर जेरबंद, मुख्य सूत्रधार रडारवर

admin by admin
April 24, 2025
in ताज्या बातम्या
Reading Time: 1 min read
बार्शीत पोलिसांची मोठी कारवाई: एमडी ड्रग्ज, गावठी पिस्तूलसह तिघे गजाआड
0
SHARES
602
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

परंडा –  परंडा शहर आणि तालुक्यात ड्रग्स माफियांनी आपले जाळे पसरले असून, अमली पदार्थांची तस्करी मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याचा गंभीर मुद्दा माजी आमदार राहुल महारुद्र मोटे यांनी उपस्थित केला आहे. यासंदर्भात त्यांनी पोलीस अधीक्षकांना निवेदन देत, या रॅकेटचा पर्दाफाश करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. विशेष म्हणजे, या प्रकाराला आळा घालण्यासाठी बार्शी पोलिसांनी नुकतीच कारवाई करत परंडा येथील चार ड्रग्स पेडलरला अटक केली असून, या प्रकरणातील मुख्य सूत्रधार हाजी मस्तान पोलिसांच्या रडारवर असल्याची माहिती समोर येत आहे.

माजी आमदार मोटे यांनी पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या काही महिन्यांपासून परंडा शहर आणि तालुक्यात एम.डी. ड्रग्स आणि इतर अमली पदार्थांची विक्री मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ड्रग्स माफिया वेगाने सक्रिय झाले असून, त्यांच्यामुळे परंडा शहर आणि ग्रामीण भागातील युवा पिढी धोक्यात आली आहे. बार्शी पोलिसांनी काही दिवसांपूर्वी यासंदर्भात कारवाई करत काही आरोपींना अटक केली असली, तरी ते पुरेसे नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. या ड्रग्स माफियांमुळे समस्या अधिक गंभीर बनली असून, यामागे मोठे रॅकेट असण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे.

या गंभीर प्रकारची पोलीस प्रशासनाने स्वतः जातीने लक्ष घालून सखोल चौकशी करावी आणि गुन्हेगारांवर कठोर कारवाई करून त्यांचा बीमोड करावा, अशी मागणी मोटे यांनी केली आहे. जेणेकरून राज्याचे आणि देशाचे भविष्य असलेली तरुण पिढी या व्यसनाधीनतेपासून वाचू शकेल.

दरम्यान, या ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यासाठी बार्शी पोलिसांनी पावले उचलली असून, परंडा परिसरातून चार ड्रग्स पेडलरला अटक करण्यात यश मिळवले आहे. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांच्या चौकशीतून या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार हाजी मस्तान असल्याचे समोर आले असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. हाजी मस्तानला अटक केल्यानंतर या ड्रग्स रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा खुलासा होण्याची शक्यता आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे परंडा परिसरातील ड्रग्स माफियांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

Previous Post

नळदुर्ग बायपासचे ‘खड्डे’ नाट्य:  सोलापूरचे प्रकल्प संचालक खासदारांनाही खोटे बोलताना रंगेहात!

Next Post

भाची असल्याचे भासवून ७९ वर्षीय वृद्धेची ७ हजार रुपयांची फसवणूक

Next Post
येरमाळ्यात कोयत्यासह दोघांना अटक; शस्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल

भाची असल्याचे भासवून ७९ वर्षीय वृद्धेची ७ हजार रुपयांची फसवणूक

ताज्या बातम्या

स्मार्ट मीटर व लोडशेडिंगविरोधात शिवसेनेचे महावितरण कार्यालयावर चक्काजाम आंदोलन

स्मार्ट मीटर व लोडशेडिंगविरोधात शिवसेनेचे महावितरण कार्यालयावर चक्काजाम आंदोलन

July 16, 2026
निसर्गाच्या सानिध्यात विठूनामाचा गजर… हरित वारीची नवी पाऊलवाट

निसर्गाच्या सानिध्यात विठूनामाचा गजर… हरित वारीची नवी पाऊलवाट

July 16, 2026
मुरुम येथील खून प्रकरणाचा ४८ तासांत उलगडा; जुन्या वैमनस्यातून कृत्य, एका आरोपीला अटक

येडशी येथील दगडू देशमुख खून प्रकरणाचा २४ तासांत छडा!

July 15, 2026
मुरुम येथील खून प्रकरणाचा ४८ तासांत उलगडा; जुन्या वैमनस्यातून कृत्य, एका आरोपीला अटक

येडशी जंगलाजवळ तरुण शेतकऱ्याचा गळा चिरून निर्घृण खून

July 15, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

शेअर मार्केट गुंतवणुकीच्या नावाखाली धाराशिवच्या व्यक्तीला ११.४६ लाखांचा गंडा!

July 15, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group