• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Tuesday, September 8, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

परंडा निवडणुकीचा करमणूक ठरलेला प्रचार : मुख्यमंत्री शिंदे – तानाजीराव यांच्यातील खास “संवाद” कार्यक्रम !

admin by admin
November 9, 2024
in गोफणगुंडा
Reading Time: 1 min read
परंडा निवडणुकीचा करमणूक ठरलेला प्रचार : मुख्यमंत्री शिंदे – तानाजीराव यांच्यातील खास “संवाद” कार्यक्रम !
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

परंडा मतदारसंघातील शिवसेना (शिंदे गट) उमेदवार आणि राज्याचे आरोग्यमंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जाहीर सभेचं शुक्रवारी आयोजन झालं होतं. वेळ ठरलेली होती दुपारची दोन, पण सूर्याची दुपारची कडक लाट जनतेच्या माथ्यावर बसली होती. उत्सुकता मात्र सभेला नक्कीच कमी नव्हती. उन्हं तुडवत आलेली लोकं पाहून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आश्चर्याने म्हणाले, “इतक्या उन्हात देखील तुम्ही आले आहात म्हणजे तानाजीराव, तुमचा विजय पक्का आहे.” पण हे त्यांना कसं समजावं की, ही जादू तानाजीरावांची नसून लक्ष्मीचे दर्शन झाले म्हणून जनतेची गर्दी झाली होती!

मुख्यमंत्र्यांनी तानाजीरावांचा वर थोडा भरही घातला, म्हणाले, “तानाजीराव म्हणजे जादूगार! लोकांना जोडायची काही तरी कला आहे त्यांच्यात.” पण कुणीतरी मनातल्या मनात हसत विचारलं असावं, “खरंच जोडणं ते का, की उधळणं ते!” कारण सगळं जनमानस ‘विकासाच्या’ नावावर जमा झालेल्या निधीबद्दलच ऐकू इच्छित होतं.

यानंतर आला तो एक खास संवाद, जो खरोखरच चर्चेत राहिला. मुख्यमंत्री शिंदे थोडेसे मिश्किल हसत म्हणाले, “तानाजीराव, तुमच्यासमोर उद्धव ठाकरेंचा उमेदवार नाही ना?” यावर तानाजीराव निस्तब्धतेने उत्तर देत म्हणाले, “नाही साहेब, तुतारीवालाच आहे!” आता हा संवाद अगदी मिश्किल पद्धतीने सुरू झाला, आणि मुख्यमंत्र्यांनी त्यावर खुशीत प्रतिक्रिया दिली, “बरं झालं, ही सीट जाणार म्हणून उद्धव ठाकरेंनी उमेदवार दिलाच नाही. पडला तर पडला, म्हणत टाळ्यांचा कडकडाट झाला.”

सभा म्हणजे निव्वळ घोषणांचा जाहीरनामा बनत चालला होता. तानाजीरावांसमोर निधीचा प्रश्न आलाच! मुख्यमंत्री पुन्हा विचारतात, “तुम्ही परंडा मतदारसंघाला किती निधी दिला हो?” आणि तानाजीराव अभिमानाने उत्तर देतात, “साहेब, आपल्याला माहित आहेच, १५०० कोटी दिले आहेत.” जनतेच्या डोक्यावर आता निधीचं आकडं फिरत होतं, त्याचं काय उपयोग झालं ते मात्र कोणालाच कळेना. मुख्यमंत्रीही तानाजीरावांचे कामं गिनवत म्हणतात, “आपण आरोग्य शिबिरं घेतली, महाआरोग्य शिबिर पंढरपूर, तुळजापुरात लावली.”

तानाजीराव यांना तरीही समाधान नव्हतं, त्यांना पुढे बोलावसं वाटलं, म्हणाले, “साहेब, आपल्या या मतदारसंघात आरोग्य केंद्रे मंजूर झाली आहेत.” यावर मुख्यमंत्र्यांनी पुढे येत हे सगळं काम परत जनतेला आठवून दिलं, “बघा बघा, तानाजीराव किती कामं करतात, आता तुम्ही त्यांना आमदार करा, मी नामदार करतो!”

मुख्यमंत्री शिंदे आणि तानाजीराव यांचा संवादातला हास्यविनोद

मुख्यमंत्री : “तानाजीराव, एवढ्या कडक उन्हात जनता बसलीय. हिचं प्रेम तुमच्यावर आहेच, पण इतक्या उन्हात आल्यावर तुमचा विजय पक्का दिसतो!”

तानाजीराव – : “साहेब, हे प्रेम आपल्या लक्ष्मीबाईचं आहे बहुतेक… म्हणजे विकासाच्या निधीचं दर्शन झालं की जनता पक्की आपलीच!”

मुख्यमंत्री : “हो हो, पण तानाजीराव, तुम्हाला सगळे जोडून ठेवण्याची कला आहे. बघा, इतके लोक उकाड्यातही तुम्हाला ऐकायला बसलेत.”

तानाजीराव : “साहेब, माझ्या जादूमुळे नाही… काही पत्रकार तर कव्हरेजसाठी आलेत, आणि बाकीचे लक्ष्मीच्या भेटीसाठी!”

मुख्यमंत्री : “बरं, तानाजीराव, तुमच्यासमोर उबाठाचा उमेदवार म्हणजे उद्धव ठाकरे यांचा माणूस नाही ना?”

तानाजीराव : “साहेब, नाही हो. फक्त तुतारीवालाच आहे!”

मुख्यमंत्री : “बरं झालं. उद्धव ठाकरेंनी तसंही उमेदवार दिला नाही; ही सीट जाणार असं त्यांना दिसतंय बहुतेक. पडला तर पडला!” (टाळ्यांचा गजर)

मुख्यमंत्री “अच्छा तानाजीराव, परंडा मतदारसंघाला किती निधी दिला तुम्ही?”

तानाजीराव : “साहेब, तुम्हाला काय सांगू? तब्बल १५०० कोटी रुपये दिलेत!”

मुख्यमंत्री : “हे बघा, १५०० कोटींचा निधी म्हणजे परंडा अक्षरशः सोने झालंय. आणि तुमचं आरोग्य कामांचं काय?”

तानाजीराव : “साहेब, पंढरपूर आणि तुळजापुरात घेतलेली महाआरोग्य शिबिरं जनतेला आठवा की!”

मुख्यमंत्री : “हो, हो… बघा, किती शिबिरं, किती आरोग्य सेवा केलीत तानाजीरावांनी. बरोबर ना?”

तानाजीराव : “साहेब, आणखी या मतदारसंघात आपण काही आरोग्य केंद्र मंजूर केली आहेत.”

मुख्यमंत्री : “बघा मंडळी, आता हे मतदारसंघाचं आरोग्य चांगलं राहणारच. तुम्ही तानाजीरावांना आमदार करा, मी त्यांना नामदार करतो!”

(टाळ्यांचा गजर आणि हास्याचा फवारा)

सभा संपली आणि जनतेने विचारलं: “काय हो, सभा होती की मुख्यमंत्री-तानाजीरावांचा ‘खास संवाद” कार्यक्रम?”

तर हे आहे परंडा निवडणुकीचे थेट ‘प्रसारण’, ज्यात सभेच्या नावाखाली तानाजींची शाबासकी होती, घोषणांचा पाऊस होता, आणि जनतेचा हा विचार होता, “नेता कुठलाही असो, मात्र विनोद ठसका देऊनच जातो!”

Previous Post

तुळजापूर विधानसभा मतदारसंघात आण्णासाहेब दराडे यांना मतदारांचा वाढता पाठिंबा

Next Post

मुरूम – स्वातंत्र्याला ७७ वर्षे उलटूनही रस्त्याअभावी शेतकऱ्यांची चिखलातून पायपीट

Next Post
मुरूम – स्वातंत्र्याला ७७ वर्षे उलटूनही रस्त्याअभावी शेतकऱ्यांची चिखलातून पायपीट

मुरूम - स्वातंत्र्याला ७७ वर्षे उलटूनही रस्त्याअभावी शेतकऱ्यांची चिखलातून पायपीट

ताज्या बातम्या

धाराशिव जिल्ह्यात लैंगिक अत्याचाराच्या तीन घटना उघडकीस; लोहारा, नळदुर्ग, बेंबळी येथे गुन्हे दाखल

नळदुर्ग : १३ वर्षीय अल्पवयीन बालिकेवर वारंवार लैंगिक अत्याचार; लग्नासाठी बेल्टने मारहाण करत धमकी

September 8, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

उमरगा : न्यायालयात प्रलंबित घराच्या जागेच्या वादातून जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण; पारेने भिंत पाडली

September 8, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

धोत्री : लोखंडी अँगलच्या पैशांवरून जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण; तामलवाडी पोलिसांत ॲट्रॉसिटीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल

September 8, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

आरळी (बु.) : दारूसाठी पैसे देण्यास नकार दिल्याने तरुणाला लोखंडी पान्याने मारहाण; दोघांवर नळदुर्ग पोलिसांत गुन्हा दाखल

September 8, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

सावरगाव : मध्यरात्री घरफोडी करत देवघरातील १३ तोळे चांदीचे दागिने अन् मंदिरातील रोकड लंपास; तामलवाडी पोलिसांत गुन्हा दाखल

September 8, 2026

Recent Posts

  • नळदुर्ग : १३ वर्षीय अल्पवयीन बालिकेवर वारंवार लैंगिक अत्याचार; लग्नासाठी बेल्टने मारहाण करत धमकी
  • उमरगा : न्यायालयात प्रलंबित घराच्या जागेच्या वादातून जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण; पारेने भिंत पाडली
  • धोत्री : लोखंडी अँगलच्या पैशांवरून जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण; तामलवाडी पोलिसांत ॲट्रॉसिटीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल
  • आरळी (बु.) : दारूसाठी पैसे देण्यास नकार दिल्याने तरुणाला लोखंडी पान्याने मारहाण; दोघांवर नळदुर्ग पोलिसांत गुन्हा दाखल
  • सावरगाव : मध्यरात्री घरफोडी करत देवघरातील १३ तोळे चांदीचे दागिने अन् मंदिरातील रोकड लंपास; तामलवाडी पोलिसांत गुन्हा दाखल
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!