परंडा :आरोपी नामे-1)आमीत सेवक कोकाटे, 2) सुमित सेवक कोकाटे, 3) सेवक भिमराव कोकाटे सर्व रा. कुंभेजा ता. परंडा जि. धाराशिव यांनी दि. 12.03.2024 रोजी 07.30 ते 08.00 वा. सु. कुंभेजा शिवारातील शेत गट नं 42/2 मध्ये फिर्यादी नामे- लक्ष्मण सदाशिव कोकाटे, वय 38 वर्षे, रा. कुंभेजा, ता. परंडा जि. धाराशिव यांना शेतातील पोल वाकडा झालेला व एक न दिसल्याने ते विचारण्याचे कारणावरुन नमुद आरोपींनी शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारहाण केली.तसेच फिर्यादीचे आई सुमनबाई व वडील सदाशिव हे भांडण सोडवण्यास आले असता नमुद आरोपींनी त्यांनाही शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारहाण केली. व फिर्यादीचे आईच तोंडावर बुक्क्या मारुन दात पाडून जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी लक्ष्मण कोकाटे यांनी दि.12.03.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन परंडा पो. ठाणे येथे 325, 324, 323, 504, 506, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
उमरगा :आरोपी नामे-1)विश्वनाथ बलभिम केशवे, 2) महेश बलभिम केशवे, 3) शंकर केशवे, 4) रुक्मीण केशवे सर्व र. मुळज ता. उमरगा जि. धाराशिव यांनी दि. 10.03.2024 रोजी 17.00 वा. सु. मुळज शिवारातील शेतात फिर्यादी नामे- कोमल दिलीप केशवे, वय 39 वर्षे, रा. मुळज ता. उमरगा जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी शेतीच्या वादाचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, काठीने माराहण करुन जखमी केले. व तुम्हाला शेतात येवू देणार नाही तुम्हाला कोठे जायचे ते जा आम्ही बघून घेतो अशी धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी कोमल केशवे यांनी दि.12.03.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उमरगा पो. ठाणे येथे 324, 323, 504, 506, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
अपघातात एक ठार
धाराशिव : मयत आरोपी नामे- दिलीप आण्णासाहेब जमखंडे, वय 51 वर्षे, रा. साई पार्क शेळगी सेलापूर ता.जि. सोलापूर हे दि.07.03.2024 रोजी दुपारी 14.00 वा. सु. येडशी येथे एनएच 52 रोडवर बार्शी उड्डाणपुला येथुन मोटरसयकल क्र एमएच 13 बीडी 8953 वरुन जात होते. दरम्यान आरोपी दिलीप जमखंडे यांनी त्याचे ताब्यातील मोटरसायकल ही हायगई व निष्काळजीपणे चालवून बार्शी उड्डाणपुलावरील संरक्षक कट्टयाला धडकून गंभीर जखमी होवून स्वत:चे मरणास कारणीभुत झाले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- सुर्यकांत इरन्ना धप्पाधुळे, वय 40 वर्षे, रा. साई पार्क शेळगी ता.जि सोलापूर यांनी दि.12.03.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम-279, 338, 304(अ) सह 184 मोवाका अन्वये गुन्हा नोंदवला आहे.