उमरगा : उमरगा शहरात बसवेश्वर विद्यालयाच्या मागे, लोणी प्लॉट परिसरात एका नवीन घरात सुरू असलेल्या तिरट नावाच्या जुगारावर पोलिसांनी छापा टाकला. गोपनीय माहितीच्या आधारावर ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत पोलिसांनी ११ जणांना रंगेहाथ पकडले असून त्यांच्याकडून २ लाख ८३ हजार १७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलिसांना या जुगार अड्ड्याबाबत माहिती मिळाली होती. त्यानुसार, त्यांनी सापळा रचून लोणी प्लॉट येथील विठ्ठल चौगुले याच्या नवीन घरावर छापा टाकला. यावेळी ११ इसम पैशांवर तिरट नावाचा जुगार खेळताना व खेळवताना आढळून आले.
या प्रकरणी पोलिसांनी खालील ११ जणांना अटक केली आहे:
१) विठ्ठल वामन चौगुले, रा. गौतम नगर, उमरगा
२) अरुण गोरोबा बिराजदार, रा. यळवट, ता. औसा, जि. लातूर
३) गोविंद मारुती सगर, रा. सुंदरवाडी, ता. उमरगा, जि. उमरगा
४) वामन लक्ष्मण गायकवाड, रा. डिग्गी, ता. उमरगा
५) महादेव काशिनाथ सलके, रा. महात्मा फुले नगर, उमरगा
६) संदीप दत्तात्रय गायकवाड, रा. पतंगे रोड, उमरगा
७) अजित रतन चव्हाण, रा. कदेर, ता. उमरगा
८) ज्ञानेश्वर माणिकराव पाटील, रा. तुरोरी, ता. उमरगा
९) इस्माईल युनूस पटेल, रा. लांमजाना, ता. औसा, जि. लातूर
१०) मदार शेख, रा. मलंग प्लॉट, उमरगा
११) संतोष बापू नारंगवाडे
या सर्वांविरुद्ध महाराष्ट्र जुगार कायद्याच्या कलम ४ आणि ५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची यशस्वी कारवाई पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले, सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग कन्हेरे, पोलीस हवालदार चेतन कोंगुलवार, पोलीस कॉन्स्टेबल योगेश सूर्यवंशी, पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण नळेगावकर तसेच चालक पोलीस हवालदार सय्यदअली खतीब यांच्या पथकाने केली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे.