• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Saturday, September 12, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

कळंब भूमी अभिलेख कार्यालयातील निमतानदार ३ हजारांची लाच घेताना रंगेहाथ; एसीबी धाराशिवची कारवाई

admin by admin
May 10, 2025
in ताज्या बातम्या
Reading Time: 1 min read
कळंब भूमी अभिलेख कार्यालयातील निमतानदार ३ हजारांची लाच घेताना रंगेहाथ; एसीबी धाराशिवची कारवाई
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव-  शेतजमिनीच्या हद्द कायम मोजणीनंतर हद्दीच्या खुणा करण्यासाठी शेतकऱ्याकडे ५ हजार रुपयांची लाच मागून, त्यापैकी ३ हजार रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारताना कळंब येथील उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयातील निमतानदार (वर्ग-३) राजू गंगाराम काळे (वय ५४ वर्षे) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी), धाराशिवच्या पथकाने शुक्रवारी रंगेहाथ पकडले. ही कारवाई कळंब शहरातील शिवाजी चौक परिसरात करण्यात आली.

याबाबत अधिक माहिती अशी की, एका २४ वर्षीय तरुण शेतकऱ्याने आपल्या गट नं. २३९ मधील शेतजमिनीची हद्द कायम मोजणी करण्यासाठी कळंब येथील उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयात अर्ज दाखल केला होता. त्यानुसार, भूमी अभिलेख कार्यालयातील निमतानदार राजू काळे (रा. आशीर्वाद नगर, अंबड रोड, जालना) यांनी ८ मे २०२५ रोजी संबंधित शेतजमिनीची मोजणी केली. मोजणी पूर्ण झाल्यानंतर हद्दीच्या कायमस्वरूपी खुणा करण्यासाठी काळे यांनी तक्रारदार शेतकऱ्याकडे ५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली.

या प्रकारानंतर पीडित शेतकऱ्याने ८ मे रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धाराशिव युनिटकडे तक्रार दाखल केली. प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने एसीबीच्या पथकाने ९ मे रोजी कळंब येथील शिवाजी चौकात सापळा रचून लाच मागणीची पडताळणी केली. यावेळी राजू काळे यांनी पंचांसमक्ष तक्रारदाराकडे ५ हजार रुपयांची लाच मागितली आणि तडजोडीअंती ३ हजार रुपये पहिला हप्ता म्हणून स्वीकारण्याचे मान्य केले.

त्यानंतर सापळा कारवाईदरम्यान, तक्रारदार शेतकऱ्याकडून ३ हजार रुपयांची लाच स्वीकारताना राजू काळे याला पंचांसमक्ष रंगेहाथ पकडण्यात आले. आरोपी काळे याच्या अंगझडतीत लाचेची रक्कम ३ हजार रुपये, त्याव्यतिरिक्त ७,६२० रुपये रोख रक्कम, एक ५ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, तक्रारदाराच्या शेत मोजणीची फाईल, एक व्हिवो कंपनीचा मोबाईल आणि एक असूस कंपनीचा लॅपटॉप आढळून आला व तो जप्त करण्यात आला आहे.

आरोपी राजू काळे याच्याविरुद्ध कळंब पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ च्या कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, त्याला अटक करण्यात आले आहे. तसेच, आरोपीच्या घराची झडती घेण्याचे काम सुरू असून, त्याचा मोबाईल फोन पुढील तपासासाठी ताब्यात घेण्यात आला आहे.

ही यशस्वी कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक संदीप आटोळे आणि अपर पोलीस अधीक्षक मुकुंद आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली, धाराशिव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक सिध्दाराम म्हेत्रे यांच्या पर्यवेक्षणाखाली पोलीस निरीक्षक नानासाहेब कदम आणि त्यांच्या पथकातील पोलीस अंमलदार सिद्धेश्वर तावसकर, शशिकांत हजारे, आशिष पाटील, जाकेर काझी यांनी पार पाडली.

भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवा

कोणत्याही प्रकारच्या भ्रष्टाचारासंबंधित तक्रार असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या टोल फ्री क्रमांक १०६४ वर संपर्क साधावा. तसेच, पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, छत्रपती संभाजी नगर (मोबाईल क्र. ९९२३०२३३६१) किंवा पोलीस उपअधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धाराशिव (मोबाईल क्र. ९५९४६५८६८६) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Previous Post

धाराशिव जिल्हा हादरला चोरींच्या सत्राने; घरे, दुकाने आणि जनावरेही चोरट्यांच्या निशाण्यावर, लाखोंचा ऐवज लंपास

Next Post

उमरगा येथे जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; ११ जणांना अटक, लाखोंचा मुद्देमाल जप्त

Next Post
बेंबळी: लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार

उमरगा येथे जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; ११ जणांना अटक, लाखोंचा मुद्देमाल जप्त

ताज्या बातम्या

प्रथमेश देशमुख कुटुंबीयांची आ. रोहित पवारांकडून सांत्वनपर भेट

प्रथमेश देशमुख कुटुंबीयांची आ. रोहित पवारांकडून सांत्वनपर भेट

September 12, 2026
‘एसआयटी’ नको; एमपीएससी गैरप्रकारांची न्यायालयीन चौकशी करा

‘एसआयटी’ नको; एमपीएससी गैरप्रकारांची न्यायालयीन चौकशी करा

September 11, 2026
आमदार राणाजगजितसिंह पाटील : मंत्रिपदाचं स्वप्न आणि ‘मित्र’ची भेट !

‘देवाभाऊंनी आदेश दिले’, पण जीआर कुठेय? राणा पाटलांची फेसबुक पोस्ट म्हणजे निव्वळ हवेतील गोळीबार; आदेश दाखवण्याचं खुलं आव्हान!

September 11, 2026
बापाची ४० वर्षांची ‘पाणीदार’ स्क्रिप्ट, खिसेगरम युट्युबर्सची फौज अन् साहेबांचा ‘तो’ कोणता डिसेंबर?

बापाची ४० वर्षांची ‘पाणीदार’ स्क्रिप्ट, खिसेगरम युट्युबर्सची फौज अन् साहेबांचा ‘तो’ कोणता डिसेंबर?

September 10, 2026
पुण्यात एमपीएससीची तयारी करणाऱ्या परंड्यातील तरुणाची आर्थिक विवंचनेतून आत्महत्या

स्पर्धा परीक्षेची धग आणि दुष्काळाची झळ; खासापुरीच्या २५ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी अंत

September 10, 2026

Recent Posts

  • प्रथमेश देशमुख कुटुंबीयांची आ. रोहित पवारांकडून सांत्वनपर भेट
  • ‘एसआयटी’ नको; एमपीएससी गैरप्रकारांची न्यायालयीन चौकशी करा
  • ‘देवाभाऊंनी आदेश दिले’, पण जीआर कुठेय? राणा पाटलांची फेसबुक पोस्ट म्हणजे निव्वळ हवेतील गोळीबार; आदेश दाखवण्याचं खुलं आव्हान!
  • बापाची ४० वर्षांची ‘पाणीदार’ स्क्रिप्ट, खिसेगरम युट्युबर्सची फौज अन् साहेबांचा ‘तो’ कोणता डिसेंबर?
  • स्पर्धा परीक्षेची धग आणि दुष्काळाची झळ; खासापुरीच्या २५ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी अंत
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!