• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Thursday, October 15, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

‘किमान मला तरी विचारा’ म्हणणाऱ्या राणा पाटलांना थेट सवाल: हातच्या कंकणाला आरसा कशाला?

मटका किंगच्या गाभारा दर्शनावरून आमदार बॅकफूटवर!

admin by admin
October 15, 2026
in ताज्या बातम्या
Reading Time: 1 min read
साहेबांचा जुना ‘भोंगा’ आणि माऊलींचा नवा ‘सायरन’! ‘व्हिजन २०३०’ च्या गोड कल्पना आणि फसव्या घोषणा!
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

तुळजापूर – कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेच्या मंदिरात सामान्य भाविक तासनतास रांगेत उन्हा-पावसात तिष्ठत असताना, सोलापूरच्या कुख्यात कथित ‘मटका किंग’ला थेट गाभाऱ्यात व्हीआयपी प्रवेश दिल्याचे प्रकरण आता भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या चांगलेच अंगलट आले आहे. आमदार पाटील यांचे खाजगी पीए सुजित जमदाडे यांनी या मटका किंगला गाभाऱ्यात नेऊन व्हीआयपी दर्शन घडवले आणि मंदिराच्या पवित्र आवारातच त्याच्यासोबत बिनदिक्कत फोटोसेशन केले. यावरून सर्वसामान्य भाविकांसह राजकीय वर्तुळातून तीव्र संताप व्यक्त होत असतानाच, “बातम्या देण्यापूर्वी खात्री करा, किमान मला विचारा तरी,” असा कांगावा करत आमदारांनी हात झटकण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, आमदारांच्या या खुलाशावरच आता थेट सवाल उपस्थित केले जात आहेत.

हातच्या कंकणाला आरसा कशाला?

राणा पाटलांनी माध्यमांना आणि विरोधकांना ‘खात्री करून बातमी देण्याचा’ सल्ला दिला खरा, पण प्रश्न असा पडतो की समोर स्पष्ट पुरावे असताना खात्री आणखी कशाची करायची?

  • खुद्द तुळजापूरच्या भोपे पुजारी मंडळाने या गंभीर प्रकारावर उघड आरोप केले आहेत.

  • आमदार महोदयांचे खाजगी पीए सुजित जमदाडे हे स्वतः त्या मटका किंगच्या खांद्याला खांदा लावून गाभाऱ्यात उभे असल्याचे फोटो सोशल मीडियावर उघडपणे फिरत आहेत.

  • हे फोटो स्वतः पीए जमदाडे यांनी काढले, मग ते काय खोटे आहेत का? ज्यांच्यावर मंदिरात भाविकांना शिस्त लावण्याची जबाबदारी दाखवली जाते, त्यांच्याच बगलबच्चांकडून अशा समाजकंटकांना थेट देवीच्या चरणांशी पायघड्या का घातल्या गेल्या?

“तुम्ही कधी फोन उचलता का?” – वेळ मारून नेण्यात राणा पाटील पटाईत!

‘किमान मला विचारा’ असा आव आणणाऱ्या आमदार राणा पाटलांना स्थानिक पत्रकार आणि जनतेचा थेट रोकडा सवाल आहे— “साहेब, तुम्ही जनतेचा किंवा पत्रकारांचा फोन कधी वेळेवर उचलता का? आणि चुकून कधी फोन उचललाच, तरी कोणत्याही गैरसोयीच्या किंवा थेट प्रश्नावर ‘या विषयावर आपण नंतर बोलू’ असे म्हणून वेळ मारून नेण्यात आपला हात कोण धरणार?” प्रत्येक संवेदनशील मुद्द्यावर टोलवाटोलवी करायची आणि प्रकरण अंगलट आले की माध्यमांनाच शहाणपण शिकवायचे, ही आमदारांची जुनीच सवय असल्याचा आरोप आता जनतेतून होत आहे.

‘तुळजापूर देवस्थान राणा पाटलांची जहागिरी आहे का?’ – अंबादास दानवेंचा घणाघात

या प्रकरणावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी आधीच राणा पाटलांची कोंडी केली आहे. “तुळजापूरचे देवस्थान राणा पाटील यांनी स्वतःच्या मालकीचे समजले आहे का? त्यांची जहागिरी लागून गेली आहे का? या प्रकरणाची चौकशी होईल म्हणणारे ते काय राज्याचे मुख्यमंत्री लागले आहेत का?” असा संतप्त सवाल दानवे यांनी उपस्थित केला होता.

दानवेंच्या या आक्रमक भूमिकेनंतर आणि भोपे पुजारी मंडळाच्या उघड विरोधामुळे राणा पाटील पार बॅकफूटवर गेले आहेत. एका बाजूला तुळजाभवानीच्या चरणी माथा टेकवण्यासाठी मैलोन्मैल पायी येणारा सर्वसामान्य वारकरी, शेतकरी तासन्तास रांगेत खितपत पडतो; तर दुसऱ्या बाजूला सत्ताधारी आमदारांचे पीए अवैध धंदेवाल्यांना थेट गाभाऱ्यात व्हीआयपी ट्रीटमेंट देतात, हा प्रकार तुळजापूरच्या जनतेच्या आणि भक्तांच्या भावनांशी थेट द्रोह करणारा आहे.

केवळ ‘मला विचारायला हवे होते’ असा कोरडा युक्तिवाद करून राणा पाटलांना आता या प्रकरणातून पळ काढता येणार नाही. आपल्या पीएच्या या कृत्यावर ते कारवाई करणार की सत्तेच्या धुंदीत आपल्या मर्जीतील लोकांना अशीच मंदिरात मनमानी करू देणार, याचे थेट उत्तर आता तुळजाभवानीच्या भक्तांना हवे आहे.

Previous Post

तुळजापूर : मध्यरात्री इनोव्हा कारमधून गावठी कट्टा व काडतूस जप्त; तुळजापूर पोलिसांची धडक कारवाई

ताज्या बातम्या

साहेबांचा जुना ‘भोंगा’ आणि माऊलींचा नवा ‘सायरन’! ‘व्हिजन २०३०’ च्या गोड कल्पना आणि फसव्या घोषणा!

‘किमान मला तरी विचारा’ म्हणणाऱ्या राणा पाटलांना थेट सवाल: हातच्या कंकणाला आरसा कशाला?

October 15, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

तुळजापूर : मध्यरात्री इनोव्हा कारमधून गावठी कट्टा व काडतूस जप्त; तुळजापूर पोलिसांची धडक कारवाई

October 15, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

नळदुर्ग : वसंत नगरातील श्री जगदंबा देवीच्या मंदिराचे कुलूप तोडून गाभाऱ्यातून ७५ हजारांचे सोन्याचे दागिने लंपास

October 15, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

उमरगा : मौलाना आझाद चौकात टोळक्याचा राडा; मित्राच्या भावाला धक्काबुक्कीचा जाब विचारल्याने तरुणावर काठ्या-दगडांनी हल्ला

October 15, 2026
 तुळजाभवानीच्या दरबारात वशिलेबाजीचा ‘मटका’; सत्ताधाऱ्यांच्या लाडक्यांचा नंगानाच!

 तुळजाभवानीच्या दरबारात वशिलेबाजीचा ‘मटका’; सत्ताधाऱ्यांच्या लाडक्यांचा नंगानाच!

October 15, 2026

Recent Posts

  • ‘किमान मला तरी विचारा’ म्हणणाऱ्या राणा पाटलांना थेट सवाल: हातच्या कंकणाला आरसा कशाला?
  • तुळजापूर : मध्यरात्री इनोव्हा कारमधून गावठी कट्टा व काडतूस जप्त; तुळजापूर पोलिसांची धडक कारवाई
  • नळदुर्ग : वसंत नगरातील श्री जगदंबा देवीच्या मंदिराचे कुलूप तोडून गाभाऱ्यातून ७५ हजारांचे सोन्याचे दागिने लंपास
  • उमरगा : मौलाना आझाद चौकात टोळक्याचा राडा; मित्राच्या भावाला धक्काबुक्कीचा जाब विचारल्याने तरुणावर काठ्या-दगडांनी हल्ला
  •  तुळजाभवानीच्या दरबारात वशिलेबाजीचा ‘मटका’; सत्ताधाऱ्यांच्या लाडक्यांचा नंगानाच!
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!