• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Monday, August 10, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

विमा घोटाळा प्रकरणात ‘ओम मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल’च्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह!

बनावट अपघात अन् उपचारांची खोटी बिले देणाऱ्या डॉक्टरांवर अद्याप गुन्हा का नाही? जवळपास १०० कोटींच्या महाघोटाळ्याची चर्चा; सखोल चौकशीची मागणी

admin by admin
July 28, 2026
in ताज्या बातम्या
Reading Time: 1 min read
विमा घोटाळा प्रकरणात ‘ओम मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल’च्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह!
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

उमरगा: एकच वाहन आणि एकच मालक दाखवून वेगवेगळ्या ठिकाणी खोटे अपघात झाल्याचे भासवत विमा कंपन्यांची लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश झाल्यानंतर आता या संपूर्ण प्रकरणाचे धागेधोरे वैद्यकीय क्षेत्रापर्यंत पोहोचले आहेत. या महाघोटाळ्यात उमरगा येथील ‘ओम मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल’ आणि तेथील डॉक्टरांची भूमिका अत्यंत संशयास्पद मानली जात असून, खोटे अपघात दाखवून उपचाराची बनावट मेडिकल बिले देणाऱ्या या रुग्णालयावर व डॉक्टरांवर अद्याप पोलिसांनी गुन्हा दाखल का केला नाही? असा संतप्त सवाल आता उपस्थित केला जात आहे.

खोटे अपघात, बनावट उपचार अन् मेडिकल बिलांचा गोरखधंदा

बजाज अलियान्झ जनरल इन्शुरन्स कंपनीच्या सोलापूर येथील अधिकाऱ्याने दिलेल्या तक्रारीनुसार, कर्नाटकच्या आळंद तालुक्यातील युवराज कारभारी आणि रमेश शेरी या भामट्यांनी संगनमत करून विमा कंपन्यांना लुटण्याचे जाळे विणले होते. मात्र, या संपूर्ण रॅकेटचा मुख्य कणा हे ‘ओम मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल’ ठरल्याचे तपासात समोर आले आहे.

अनेक प्रकरणांत अपघात खोटे असल्याचे आणि रुग्णांवर केलेले उपचारही केवळ कागदावरच दाखवले गेल्याचे स्पष्ट होत आहे. अपघातात जखमी झाल्याचे केवळ भासवून विमा कंपन्यांकडून क्लेम उकळण्यासाठी ओम मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलने बनावट कागदपत्रे आणि लाखो रुपयांची खोटी मेडिकल बिले तयार करून दिल्याचे निदर्शनास आले आहे.

हॉस्पिटल आणि डॉक्टरांना पाठीशी घातले जातेय का?

विमा कंपनीला चुना लावण्यासाठी बनावट वैद्यकीय प्रमाणपत्रे, बनावट डिस्चार्ज कार्ड आणि फुगवलेली केस पेपर्स तयार करून देणाऱ्या या रुग्णालयातील जबाबदार डॉक्टरांवर कारवाई करण्याबाबत पोलीस प्रशासन मवाळ भूमिका का घेत आहे, याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. अशा प्रकारचा बोगस धंदा चालवणाऱ्या डॉक्टर आणि हॉस्पिटल व्यवस्थापनाला या गुन्ह्यात सह-आरोपी करून त्यांच्यावर तात्काळ गुन्हा नोंदवण्याची मागणी नागरिकांमधून व विमा क्षेत्रातून होत आहे.

सुमारे १०० कोटींच्या महाघोटाळ्याची चर्चा; इतर कंपन्यांनाही गंडा?

उमरगा शहरात व परिसरात या प्रकरणावरून मोठी खळबळ उडाली असून, हा प्रकार केवळ एकाच कंपनीपुरता किंवा काही लाखांपुरता मर्यादित नसून जवळपास १०० कोटी रुपयांचा भव्य विमा घोटाळा असण्याची जोरदार चर्चा सुरू आहे. ओम मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलने अशाच प्रकारे आणखी किती विमा कंपन्यांना, किती रुग्णांच्या नावाने बोगस वैद्यकीय बिले देऊन कोट्यवधी रुपयांचा गंडा घातला आहे? याचा उच्चस्तरीय पोलीस पथकाकडून (एसआयटी) सखोल शोध घेण्याची तीव्र गरज निर्माण झाली आहे.

काय आहे मूळ प्रकरण?

बजाज जनरल इन्शुरन्स कंपनीचे सोपान रावणराव बिरादार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, कलबुर्गी न्यायालयातील एका दाव्याच्या (क्र. १७/२०२६) चौकशीदरम्यान युवराज कारभारी याच्या मालकीच्या एकाच दुचाकीवर (MH 25 W 6495) उमरगा आणि मदनहिप्परगा पोलीस ठाण्यात वेगवेगळे खोटे अपघात दाखवून दावे ठोकल्याचे उघड झाले होते. तसेच रमेश शेरी याच्या वाहनांवरही वेगवेगळ्या विमा कंपन्यांकडे तब्बल १०-१० दावे दाखल असल्याचे समोर आले. या सर्व दाव्यांमध्ये उपचारासाठी केवळ ‘ओम मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल’चीच कागदपत्रे जोडण्यात आली होती.

या आंतरराज्यीय विमा आणि मेडिकल घोटाळ्यात आता ओम मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या डॉक्टरांवर पोलीस कधी कारवाई करतात आणि या १०० कोटींच्या चर्चेतील घोटाळ्याचे सत्य बाहेर आणतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Previous Post

धाराशिव जिल्ह्यात चोरीच्या तीन घटना; दुचाकी, सोलर केबल आणि बोअरवेलची वायर लंपास

Next Post

काळे अपमान प्रकरण तापले; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष आणि मंत्र्यांची भेट घेणार शिष्टमंडळ, भाजपची जुनी टीम आक्रमक

Next Post
काळे अपमान प्रकरण तापले; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष आणि मंत्र्यांची भेट घेणार शिष्टमंडळ, भाजपची जुनी टीम आक्रमक

काळे अपमान प्रकरण तापले; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष आणि मंत्र्यांची भेट घेणार शिष्टमंडळ, भाजपची जुनी टीम आक्रमक

ताज्या बातम्या

धाराशिव जिल्ह्यात शिक्षक भरतीत ३०० बोगस नियुक्त्या!

२४० कोटींचा नवा ‘महाल’, १४ कोटींचे थकीत भाडे आणि मोक्याच्या जागेवर बांधा-वापरा-हडपा (BOT) चा डाव!

August 10, 2026
धाराशिव जिल्ह्यात शिक्षक भरतीत ३०० बोगस नियुक्त्या!

१.१५ कोटींचा कोरोना निधी: ११ बैठका, शून्य निर्णय आणि गुरुजींचा संताप!

August 10, 2026
धाराशिव कृषी निविष्ठा घोटाळा : कोणते अधिकारी निलंबित?

धाराशिव कृषी निविष्ठा घोटाळा: १४ अधिकाऱ्यांचे निलंबन, मात्र २९ शेतकरी उत्पादक आणि २ निर्मिती कंपन्यांना ‘राजाश्रय’

August 10, 2026
तरुणांना रोजगाराच्या अनगिनत संधी उपलब्ध करून देणारा अंतरिम अर्थसंकल्प – आ.राणाजगजितसिंह पाटील

३६ महसूल मंडळांतील शेतकऱ्यांना पीक विमा भरपाई द्या

August 9, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

कळंब बसस्थानकात महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठन लंपास

August 9, 2026

Recent Posts

  • २४० कोटींचा नवा ‘महाल’, १४ कोटींचे थकीत भाडे आणि मोक्याच्या जागेवर बांधा-वापरा-हडपा (BOT) चा डाव!
  • १.१५ कोटींचा कोरोना निधी: ११ बैठका, शून्य निर्णय आणि गुरुजींचा संताप!
  • धाराशिव कृषी निविष्ठा घोटाळा: १४ अधिकाऱ्यांचे निलंबन, मात्र २९ शेतकरी उत्पादक आणि २ निर्मिती कंपन्यांना ‘राजाश्रय’
  • ३६ महसूल मंडळांतील शेतकऱ्यांना पीक विमा भरपाई द्या
  • कळंब बसस्थानकात महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठन लंपास
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!