बेंबळी – रुईभर येथे दोन गटात झालेल्या हाणामारीच्या घटनेत बेंबळी पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले आहेत.
पहिल्या घटनेत, नेताजी धुमाळ, अक्षय पाडोळे, सुर्याजी धुमाळ आणि गोरोबा पाडोळे यांनी अरुण भोयटे यांना मोबाईलवर सेस्टस ठेवल्याच्या कारणावरून शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी, काठी व कोयत्याने मारहाण करून जखमी केले. तसेच जिवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार अरुण भोयटे यांनी दिली आहे.
दुसऱ्या घटनेत, अरुण भोयटे, पदमराज भोयटे आणि पुष्पराज भोयटे यांनी सुर्याजी धुमाळ यांना म्हैस अंब्याच्या झाडाजवळ बांधल्याच्या कारणावरून शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी, काठी व रॉडने मारहाण करून जखमी केले. तसेच जिवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार सुर्याजी धुमाळ यांनी दिली आहे.
दोन्ही घटनांमध्ये बेंबळी पोलिसांनी भा.न्या.सं. कलम 118(1), 115(2), 352, 351(2) (3), 3(5) अन्वये गुन्हे दाखल केले असून पुढील तपास सुरू आहे.