लोहारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात एका तीन वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 9 सप्टेंबर 2024 रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास ही मुलगी खेळण्यासाठी शेजारी राहणाऱ्या एका तरुणाच्या घरी गेली होती. त्यावेळी या तरुणाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे.
मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी तरुणावर भा.न्या.सं. कलम- 64(1), 65(2), सह कलम 4, 6 बा.लै.अ.अधि 2012 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
पीडित मुलीचे नाव आणि गाव गोपनीय ठेवण्यात आले आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून आरोपीला अटक करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.