धाराशिव जिल्ह्यातून जाणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाच्या अलाईनमेंटमध्ये मोठा बदल करण्यात आला असून, देवळालीहून वडगाव मार्गाने हा महामार्ग नेण्याऐवजी तो अचानक एका सत्ताधारी आमदाराच्या कॉलेजजवळून नेण्यात येतोय! या बदलामागील कारणे आणि हेतू संदिग्ध असले तरी, यामध्ये स्वार्थाचा मोठा डाव असल्याचा संशय आता बळावत आहे!
हा बदल कोणी आणि का केला?
सुरुवातीच्या योजनेनुसार, हा महामार्ग वडगाव मार्गे गेला असता, तर प्रामुख्याने माळरान, कमी सुपीक जमिनी गेलेल्या असत्या. पण आता मार्ग वळवून तो आमदाराच्या कॉलेजजवळून नेण्यात येत आहे.
या बदलामुळे मोठे प्रश्न निर्माण झाले आहेत:
🔹 हा बदल कोणी आणि कश्यासाठी केला?
🔹 या महामार्गामुळे आमदारांना व्यावसायिक फायदा होतोय का?
🔹 कॉलेज सध्या चालत नाही,यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारीलाही पैसे नसतात. त्यामुळे ते बंद करण्याचा घाट घातला जातोय का?
🔹 मार्ग बदलल्यामुळे शेकापूरसारख्या सुपीक जमिनी गेल्या, याचा फायदा कुणाला?
टी-पॉइंट आणि बिझनेस हबचा ‘संपत्तीयोग’!
महामार्गाची दिशा बदलल्यामुळे त्या ठिकाणी मोठा टी-पॉइंट, मॉल, फूड जंक्शन आणि बिझनेस हब उभा करण्याचा डाव आखला जात आहे. या व्यावसायिक केंद्रांमुळे कोट्यवधींचा फायदा होणार असून, हा महामार्ग नेमका कुणाच्या विकासासाठी आहे, हा खरा प्रश्न आहे.
फक्त ११ गुंठे आमदारांच्या जागेवरून महामार्ग जाणार, पण…
तपासणीअंती आढळलं आहे की, महामार्गासाठी फक्त ११ गुंठे जागा आमदारांच्या कॉलेजची जाणार आहे. त्यामुळे प्रश्न असा आहे की, एवढ्या छोट्या जागेसाठी हा मोठा मार्ग वळवला गेला, की यामागे मोठा आर्थिक स्वार्थ लपलेला आहे?
जर महामार्ग वडगाव मार्गे गेला असता, तर शेतीला कमी हानी झाली असती, पण हा मार्ग बदलण्यात आला. मग हा बदल का झाला? कोणाच्या इशाऱ्यावर झाला? कोणाचे अर्थकारण यामध्ये लपले आहे?
धाराशिव Live कडे ‘खुलासा करणारे पुरावे’!
या बदलामागील खासगी हितसंबंध आणि राजकीय स्वार्थ उघड करणारे महत्त्वाचे दस्तऐवज आणि पुरावे धाराशिव Live कडे आले आहेत. लवकरच याचा संपूर्ण खुलासा केला जाईल!
या प्रकरणावर शासन, प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधींचे मौन संशयास्पद आहे! हा महामार्ग जनतेच्या हितासाठी आहे की काही मोजक्या लोकांच्या खिशात पैसे टाकण्यासाठी? या प्रश्नाचे उत्तर लवकरच मिळेल!
🔴 धाराशिव Live या संपूर्ण प्रकरणावर बारीक लक्ष ठेवून आहे. लवकरच आणखी मोठा गौप्यस्फोट!