धाराशिव: जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर धाराशिव जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने धारूर आणि उपळा भागात प्रचाराचा जोरदार धडाका लावत विरोधकांना धडकी भरवली आहे. पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत खासदार ओमराजे निंबाळकर आणि सुप्रसिद्ध व्याख्याते प्रा. नितीन बानगुडे पाटील यांच्या उपस्थितीत निवडणुकीचा शंखनाद करण्यात आला.


या सभेला शिवसैनिकांसह शेतकरी, कष्टकरी, महिला आणि तरुणांची अलोट गर्दी झाली होती. जमलेला हा जनसागर पाहून या भागात शिवसेनेची ताकद पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. यावेळी बोलताना खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केंद्र व राज्य सरकारवर सडकून टीका केली. ते म्हणाले, “आम्ही केवळ निवडणुका जिंकण्यासाठी नाही, तर लोकांची मने जिंकण्यासाठी आणि त्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवण्यासाठी मैदानात आहोत. पारदर्शक कारभार हेच आमचे मुख्य सूत्र असेल.”


तसेच, प्रा. नितीन बानगुडे पाटील यांनी आपल्या आक्रमक आणि शैलीदार भाषणाने उपस्थित शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य निर्माण केले. या सभेमुळे धारूर आणि उपळा परिसरातील वातावरण पूर्णपणे ढवळून निघाले आहे.
मैदानात उतरलेले अधिकृत उमेदवार:
या सभेद्वारे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या खालील उमेदवारांच्या विजयाचा निर्धार व्यक्त करण्यात आला:
-
वडगाव सिद्धेश्वर गट: लक्ष्मी राजेंद्र जाधव
-
वडगाव सिद्धेश्वर गण: अंकुश शंकर मोरे
-
चिलवडी गण: अंगद राजाराम धावारे
-
उपळा गट: ललित धोंडोपंत सारोळकर
-
उपळा (मा) गण: वर्षा प्रमोद पडवळ
-
वाघोली गण: विशाल लक्ष्मण शिंदे
सर्व उमेदवारांनी यावेळी मतदारांना संबोधित करताना, “प्रामाणिक सेवा आणि लोकहितासाठी कटिबद्ध राहून मतदारसंघाचा कायापालट करू,” अशी ग्वाही दिली.
या प्रचारसभेस सतीश सोमानी, सोमनाथ गुरव, रवी वाघमारे, सौदागर जगताप, अमोल मुळे, किरण बोचरे, अण्णा पवार, नेताजी शिंदे, बालाजी गुरव, विश्वजीत गुरव, अण्णा पांढरे, बळीराम कांबळे, विश्वास मोरे, दयानंद सरपाळे, योगेश गरड, चंद्रकांत गांदले यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.







