धाराशिव : एसटी महामंडळ तोट्यात असल्यामुळे भाडेवाढ करणे अपरिहार्य होते, अशी माहिती राज्याचे परिवहन मंत्री सरनाईक यांनी दिली. काल रात्रीपासूनच एसटीच्या भाड्यात वाढ लागू करण्यात आली आहे.
परिवहन मंत्री सरनाईक यांनी धाराशिव येथील तुळजाभवानी मंदिरात दर्शन घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी एसटी महामंडळाच्या भाडेवाढीबाबत स्पष्टीकरण दिले. “एसटीची भाडेवाढ करताना मंत्रिमंडळाच्या परवानगीची आवश्यकता नसते,” असे ते म्हणाले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील यापूर्वी एसटी भाडेवाढीचे समर्थन केले होते. परिवहन मंत्र्यांनी तुळजाभवानीच्या मंदिरातून एसटी महामंडळाच्या आर्थिक स्थितीवर भाष्य करताना भाडेवाढ ही अपरिहार्य असल्याचे सांगितले.
ही भाडेवाढ लागू झाल्याने प्रवाशांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काही प्रवासी याला विरोध करत असताना, काहींनी एसटी महामंडळाच्या तोट्याला भरून काढण्यासाठी हे पाऊल आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले आहे.
संपूर्ण बाईट ऐका